शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

नीरा खो-यातील धरणं काठोकाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 06:21 IST

पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर आणि पुरंदर; तर सातारा जिल्ह्यातील फलटण व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस या तालुक्यांना वरदान ठरलेल्या नीरा-देवघर, भाटघर, वीर आणि गुंजवणी या धरणांमधील पाण्याची पातळी समाधानकारक वाढत आहे.

सोमेश्वरनगर : पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर आणि पुरंदर; तर सातारा जिल्ह्यातील फलटण व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस या तालुक्यांना वरदान ठरलेल्या नीरा-देवघर, भाटघर, वीर आणि गुंजवणी या धरणांमधील पाण्याची पातळी समाधानकारक वाढत आहे. गुंजवणी धरणाचा लावादाचा निर्णय अजून न झाल्याने गुंजवणीसह तिन्ही धरणांमधून येणाºया पाण्यामुळे वीर धरण ८८ टक्के भरले आहे.पंधरा दिवसांपासून नीरा-देवघर, भाटघर आणि गुंजवणी या धरणक्षेत्रांत पावसाची संततधार सुरू असल्याने धरणांतील पाण्याचा साठा समाधानकारकरीत्या वाढू लागला आहे. धरणांची टक्केवारी आता ७० च्या पुढे गेली आहे. या वर्षी धरणक्षेत्रात पाऊस पडत असला, तरीही पूर्वेचा भाग ताहनलेला आहे.नीरा-देवघर धरणक्षेत्रात १,३५९ मिलिमीटर, भाटघर धरणक्षेत्रात ४०५ मिलिमिटर तर वीर धरणक्षेत्रात ८५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे नीरा-देवघर धरणात ७४ टक्के, भाटघर धरणात ७२ टक्क्के तर वीर धरणात ८८ टक्के अशी वाढ झाली आहे.दोन-तीन वर्षांपासून नीरा खोºयात पावसाचे प्रमाण कमीच राहिले आहे. गेल्या वर्षी पाऊस अशाच प्रकारे उशिरा सुरू झाला होता. काही दिवसांतच सर्व धरणे १०० टक्के भरली होती. तर, त्याच्या गतवर्षी गुंजवणी धरण वगळता इतर तीन धरणे १०० टक्के भरली नव्हती. जूनमध्ये पडणाºया मॉन्सूननेही अनेक भागांमधून दगा दिल्याने विहीर व बोअरवेलच्या पाणी पातळीत फरक पडला नाही.सध्या ऊसलागवडीचा हंगाम सुरू असून विहिरी आणि बोअरवेलने तळ गाठला आहे. नीरा खेºयातील साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात हजारो एकर उसाची लागवड झाली आहे. पाणीच नसल्याने मोठा ऊस जगवयाचा की लहान लागवड जगवयाची, अशा द्विधा मन:स्थितीत शेतकरी सापडला आहे.