पुणे : जिल्ह्यातील भामा आसखेड व चासकमान या दोन धरणातून ८२.२१ दलघमी म्हणजे २.९0 टिएमसी पाणी उजनी धरणात सोडण्याचा फेरनिर्णय महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने नुकताच दिला होता. त्यानुसार पोलीस बंदोबस्तात बुधवारपासून पाणी सोडण्यास सुरूवात झाली. चासकमान धरणातून सकाळी दहा वाजता चार दरवाज्यांद्वारे तीन हजार क्युसेक्स वेगाने भीमा नदीपात्रात तर भामा-आसखेड धरणातून १,००० क्युसेक्सने पाणी सोडले आहे.पुणे जिल्ह्यातील भामा आसखेड, चासकमान, मुळशी, कासारसाई, आंध्रा व वडीवळे या धरणांमधून सोलापूरसाठी उजनी धरणात २९१.८१ दलघमी म्हणजे १०.३0 टिएमसी पाणी सोडण्याचा निर्णय २६ आॅक्टोबर रोजी प्राधिकरणाने दिला होता. याला स्थगित देत फशरनिर्णय देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार भामा आसखेड धरणातून ६१.५१ दलघमी व चासकमान धरणातून २0.७0 दलघमी पाणी उजनीत सोडण्याचे आदेश दिले आहेत. या दोन्ही धरणातून मिळून उजनीत ८२.२१ दलामी म्हणजे २.९0 टिएमसी पाणी सोडले जाणार आहे. यापूर्वी १0.३0 टिएमसी पाणी सर्व धरणातून सोडण्याचा निर्णय होता. पाठपुरावा केल्याने ७ टिएमसी पाणी वाचले होते. ?जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाणी सोडण्याबाबतचे नियोजन झाले असून पोलीस, पाटबंधारे व महावितरण यांची बैठक घेण्यात आली होती. यानुसार १५ ते २२ जानेवारी या कालावधीत दोन्ही धरणांमधून उजनीत पाणी सोडण्यात येणार असल्याचे मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र आजपासूनच पाणी सोडण्यात आले.
बंदोबस्तात उजनीला सोडले पाणी
By admin | Updated: January 14, 2016 03:52 IST