शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वेल्ह्याची ‘पाणी’पंचाईत!

By admin | Updated: May 2, 2015 05:23 IST

वर्षभरापूर्वी शासनाने तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी राज्यात नगर पंचायती करण्याची प्राथमिक उद्घोषणा केली. त्यात वेल्हे ग्रामपंचायतीचाही समावेश असून

पुणे : वर्षभरापूर्वी शासनाने तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी राज्यात नगर पंचायती करण्याची प्राथमिक उद्घोषणा केली. त्यात वेल्हे ग्रामपंचायतीचाही समावेश असून, तेथे सुरू असलेली पाणी योजना थांबविण्यात येत असल्याचे पत्र जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीला दिले आहे. शासन नगरपंचायतीची घोषणा करेना आणि जिल्हा परिषद आपले मानेने अशी स्थिती गावची झाली असून त्यांची ‘पाणी’पंचाईत झाली आहे. आज विशेष ग्रामसभा घेवून ‘नगर पंचायत नको, पण पाणी द्या,’ असा ठराव करण्यात आला आहे.३१ मे २०१४ रोजी शासनाने हा निर्णय घेतला आहे. यानुसार पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव, मुळशी तालुक्यातील पौड, वेल्हे तालुक्यातील वेल्हे आणि मावळ तालुक्यात वडगाव या ग्रामपंचायतींच्या नगर पंचायती होणार आहेत. मात्र, शासन अध्यादेश काढत नसल्याने या ग्रामपंचायतींत अडचणी निर्माण होत आहेत. या संदर्भात ‘लोकमत’ने ‘तालुका मुख्यालयी नगर परिषदा कधी?’ असे वृत्त २९ एप्रिल रोजी प्रसिद्ध करून गावकारभाऱ्यांच्या व्यथा मांडल्या. यातील वेल्हे ग्रामपंचायतीसाठी २०१४ या आर्थिक वर्षासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत १ कोटी ९२ लाख ६५ हजारांची नळपाणी पुरवठा योजना मंजूर झालेली असून, तिचा ५४,११,९९३ रुपयांचा पहिला हप्ताही डिसेंबर २०१४ रोजी ग्रमापंचायतीच्या खात्यात जमा झाला आहे. आता जिल्हा परिषदेतर्फे कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे ग्रामपंचायतीला पत्र पाठवून ही योजनाच रद्द करण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे. बेल्हे बुद्रुक हे गाव नगर पंचायत म्हणून घोषित करण्यात आले आहे. तरी हे गाव अधिसूचनेनुसार नागरी क्षेत्रात समाविष्ट झाले आहे. नागरी क्षेत्र घोषित करण्यात आलेल्या गाव/वाड्यांसाठी राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत नळपाणी पुरवठा योजनेच्या कामाला मंजुरी किंवा मंजुरी देण्यात आलेल्या कामांची अंमलबजावणी रद्द करण्याबाबतच्या सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. तरी, येथील पाणी योजनेचे काम रद्द करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीला पहिल्या हप्त्यासाठी दिलेली ५४ लाख ११ हजार ९९३ रुपयांची रक्कम तत्काळ या कार्यालयाकडे वर्ग करावी, असेही सुचविले आहे. त्यामुळे गावकारभारी हवालदिल झाले आहेत.