शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनात मांडणार पाणीप्रश्न

By admin | Updated: November 27, 2015 01:33 IST

येथे चासकमानचे पाणी उजनीस देण्याच्या निर्णयास विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चार दिवसांपासून चासकमान विभागीय कार्यालय येथे सुरू करण्यात आलेल्या

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथे चासकमानचे पाणी उजनीस देण्याच्या निर्णयास विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चार दिवसांपासून चासकमान विभागीय कार्यालय येथे सुरू करण्यात आलेल्या चक्रीउपोषणास भेट देऊन पाठिंबा दर्शवत चासकमानचा प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडणार असल्याचे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.वळसे पाटील म्हणाले कि पाणी देण्याचा निर्णय आमच्या विरोधात गेला त्यामुळे न्यायालय व लोकशाही मार्गाने संघर्ष करण्याचा पर्याय निवडावा लागला. तरी देखील सरकारला जाग आलेली नाही. त्यामुळे आता मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाची प्रतीक्षा करावा लागेल. तरी याबबत पाठबंधारे मंत्री गिरीश महाजन, गृहमंत्री राम शिंदे यांचेशी चर्चा केली आहे. तरी या ठिकाणी चासकमान च्या असलेल्या अधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवाव्यात तरी यांनतर देखील जर सरकारला जग आली नाहीच तर अन्यायाचा प्रतिकार केल्याशिवाय हा शेतकरी राहणार नसल्याचे सांगत प्रत्येक वेळेस शेतकरी शांततेत आंदोलन करतील असे नाहीच तर यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असे देखील वळसे यांनी सांगितले. आंदोलन स्थळी चासकमान चे सहाय्यक अभियंता एस. जि. शहापुरे, शाखा अभियंता एस. एन. भुजबळ, शाखा अभियंता एस. बि. संतीकर उपविभागीय अभियंता यु. जि. मुंडे हे आले असता चार दिवसानंतर आलेल्या अधिकाऱ्यांवर आंदोलक शेतकऱ्यांनी प्रश्नांचा भडीमार करत चांगले फैलावर धरले व या अधिकाऱ्यांना घेराव घातला. यावेळी शेतकऱ्यांनी या ठिकाणच्या क्षेत्रातील कोणत्या तळ्या खाली किती क्षेत्र ओलिताखाली आहे हे या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी विचारले असता त्यांना ते आजीबात सांगता आले आही. यावेळी भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील यांनी देखील आंदोलकांची भेट घेत मार्गदर्शन केले. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, सभापती सिद्धार्थ कदम, बाजार समिती उपसभापती मानसिंग पाचुंदकर, जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब शिंदे, तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, जिल्हा कॉंग्रेस सरचिटणीस किशोर गायकवाड, खंडाळेचे सरपंच राजेंद्र नरवडे, बाभूळसर चे सरपंच दशरथ फंड, बाजार समिती संचालक राजेंद्र गावडे, समाधान डोके, बुरुंजवाडीचे सरपंच पूनम टेमगिरे, प्रवीण कौटकर यांसह आदी मान्यवर तसेच शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (वार्ताहर)