शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

सासवडकरांवर ‘पाणीसंकट’

By admin | Updated: February 27, 2016 04:30 IST

गराडे व घोरवडी लघुपाटबंधारे तलावातून सासवड नगरपरिषदेला होत असलेला पाणीपुरवठा बंद करण्याचे पत्र पाटबंधारे विभागाने दिले आहे. त्यामुळे सासवडकरांसमोर ‘पाणीसंकट’

सासवड : गराडे व घोरवडी लघुपाटबंधारे तलावातून सासवड नगरपरिषदेला होत असलेला पाणीपुरवठा बंद करण्याचे पत्र पाटबंधारे विभागाने दिले आहे. त्यामुळे सासवडकरांसमोर ‘पाणीसंकट’ उभे राहिले आहे. यामुळे २०० टँकरने साधारण ५० हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा करावा लागणार असल्याची माहिती नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली. या जलाशयातील पाणी बंद झाल्यास वीर योजनेतून पाणीपुरवठा करावा लागला तर सध्याच्या नियोजनाप्रमाणे सासवड शहराला पाणीपुरवठा करण्यास अडचणी येतील, असे जगताप यांनी सांगितले. तहसीलदार पुरंदर यांच्या कार्यालयात नुकतीच पाणीटंचाई बैठक झाली होती. त्यानुसार गराडे लघुपाटबंधारे विभागाच्या शाखाधिकाऱ्यांनी सासवड नगरपरिषदेला या दोन्ही जलाशयांतून पाणी वापर बंद करावा, असे पत्र दिले होते. दरम्यान, नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांसह नगरसेवक अजित जगताप, मनोहर जगताप, कैलास जगताप, पाणीपुरवठाप्रमुख ज्ञानेश्वर गिरमे व सागर भुतकर यांनी गराडे जलाशयाला भेट देऊन पाणीपातळीची पाहणी केली. सासवडला दररोज ५० लाख लिटर पाण्याची गरज असून, गराडे ३० लाख लिटर, घोरवडी आणि वीरमधून प्रत्येकी १० लाख लिटर पाणी घेतले जाते. या नियोजनामुळे गराडे व घोरवडीतील पाणी एप्रिलअखेरपर्यंत पुरणार असल्याचे ज्ञानेश्वर गिरमे यांनी सांगितले. (वार्ताहर)गराडेत २७, तर घोरवडीत २० एमसीएफटी पाणीसध्या गराडेत २७ एमसीएफटी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे सासवड नगरपरिषद दिवसाआड व मीटर पद्धतीने पाण्याचे नियोजन करून पाणीपुरवठा करीत आहे. कोडीतच्या पाणी योजनेची विहीर जलाशयाच्या खालच्या बाजूला आहे. तर घोरवडीमध्ये २० एमसीएफटी पाणीसाठा शिल्लक असून, यातून असणाऱ्या दिवे, सुपे व पिंपळे पाणी योजनांना जून २०१६ पर्यंत केवळ ५ एमसीएफटी पाण्याची आवश्यकता आहे. सासवड नगरपरिषदेने घोरवडी जलाशयातील पिण्याच्या पाण्यासाठी पाटबंधारे विभागाने केलेल्या पाणी बिल मागणीप्रमाणे माहे जून २०१६ पर्यंतचे पाणीबिल भरलेले आहे. असे असतानाही पाणीपुरवठा बंद करावा, असे पत्र नगरपरिषदेस दिले आहे.