शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

संथ कामांंंंमुळे बारामतीकरांवर पाणीसंकट

By admin | Updated: February 14, 2016 03:18 IST

अत्यंत संथगतीने चालणाऱ्या प्रशासनाच्या कामामुळे बारामतीकरांवर पाणीसंकट आले आहे. धरणातील पाणीसाठा कमी आहे. त्यातच २०१२ पासून सुरू असलेल्या साठवण तलावाचे

बारामती : अत्यंत संथगतीने चालणाऱ्या प्रशासनाच्या कामामुळे बारामतीकरांवर पाणीसंकट आले आहे. धरणातील पाणीसाठा कमी आहे. त्यातच २०१२ पासून सुरू असलेल्या साठवण तलावाचे काम अद्याप पूर्ण नाही. त्यामुळे मागील महिन्यापासून एक दिवसाआड पाणीपुरवठा होत होता. आता आवर्तन लांबल्याने दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आली आहे. कामाचा ठेका दिल्यापासून वादग्रस्त ठरलेले काम पूर्ण कधी होणार, अशी विचारणा केली जात असताना ठेकेदाराने वाढीव कामासाठी आणखी २७ कोटी रुपयांची जादा मागणी केली आहे. त्यामुळे या कामाचा खर्च ६८ कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. बारामती नगरपालिकेच्या यापूर्वीच्या साठवण तलावाचे काम याच ठेकेदाराने केले. १२७ दशलक्ष लिटर्स क्षमतेच्या या तलावाची गळती काढण्यासाठी मागील वर्षी ऐन उन्हाळ्यात साठवलेल्या पाण्याचा उपसा करावा लागला होता. वास्तविक या तलावालादेखील सुरुवातीला ठरलेल्या आर्थिक तरतुदीपेक्षा जादा खर्च झाला होता. कामाचा दर्जाच नसलेल्या ठेकेदरालाच सुरुवातीला ३०० दशलक्ष लिटर्स क्षमतेच्या साठवण तलावाचे काम दिले. त्याची निविदा जादा दराने मंजूर करण्यात आली. ४१ कोटी रुपये खर्चाच्या कामाला सुजल निर्मल योजना, यूआयडी एसएसएम योजनेतून निधी उपलबध करण्यात आला. डिसेंबर २०१४ मध्ये काम पूर्ण करण्यात येणार होते. या ठेकेदाराने पूर्वी केलेल्या कामाच्या साठवण तलावाला गळती लागली. दररोज ८ ते १० लाख लिटर्स पाणी मोटार लावून पुन्हा तळ्यात सोडण्याची कसरत नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला करावी लागत होती. याबाबत पत्रव्यवहार केल्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तलावाची पाहणी केली. त्यांनी तलावातील पाणी उपसा करून गळती काढण्याचे काम हाती घेतले. त्यामुळे नव्या साठवण तलावाच्या कामासाठी खोदलेल्या कामातच पाणी साठवण्यात आले. त्यामुळे काम थांबले. त्यानंतर उर्वरित जागादेखील साठवण तलावासाठी व्यापण्याचा निर्णय झाला. ३०० हून ३५५ दशलक्ष लिटर्स क्षमतेचा साठवण तलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला. जळोची, तांदूळवाडी, खंडोबानगरसाठी नगरपालिकेच्या हद्दीत येण्यापूर्वी पाण्याच्या योजना झाल्या. त्यामुळे त्या भागातील नागरिकांना या साठवण तलावावर अवलंबून राहावे लागले नाही. मात्र, जवळपास १० पट क्षेत्रफळ वाढलेल्या बारामतीकरांना साठवण तलावाच्या कामात विलंब झाल्याने आज पाणीटंचाईचे संकट सहन करावे लागत आहे. २४ तास पाणीपुरवठा केला जाईल, असे अनेकदा जाहीर करण्यात आले, परंतु साठवण तलावाचे कामच पूर्ण न झाल्यामुळे दोन दिवसाआड पाणीपुरवठ्याचे संकट ओढावलेले आहे. (प्रतिनिधी)