शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

कालव्यातून पाण्याची राजरोस चोरी

By admin | Updated: April 26, 2017 04:04 IST

सार्वजनिक पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे नवीन मुळा-मुठा कालव्यावरील पुलांना शहर व उपनगरांमध्ये दुरुस्तीअभावी अनेक ठिकाणी भगदाड पडून मोठ्या प्रमाणात पाणीगळती

फुरसुंगी : सार्वजनिक पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे नवीन मुळा-मुठा कालव्यावरील पुलांना शहर व उपनगरांमध्ये दुरुस्तीअभावी अनेक ठिकाणी भगदाड पडून मोठ्या प्रमाणात पाणीगळती होऊन दररोज लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. कालव्याच्या भरावाचीदेखील जागोजागी प्रचंड दुरवस्था होऊन पाणीगळती व पाणीचोरीही मोठ्या प्रमाणात होत आहे.खडकवासला धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याची नवीन मुळा-मुठा कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत असल्याने दरदोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या वरदहस्तामुळे व जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे कालव्यातून राजरोसपणे पाणीचोरी होत असल्याचेही निदर्शनास आले आहे.या कालव्यातून सोडण्यात येणारे पाणी पुणे शहर व उपनगरांतून फुरसुंगी, लोणी काळभोर, यवत आदी परिसरातून जात असल्याने या भागातील लाखो नागरिकांना पिण्यासाठी व लाखो हेक्टर शेतीसाठी हा कालवा महत्त्वपूर्ण आहे. अशा वेळी कालव्याच्या भरावाची व पुलांची दुरवस्था झाल्याने या कालव्यातून बारमाही दररोज लाखो लिटर पाण्याची गळती होत असल्याने दर वर्षी शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. तर, ग्रामीण भागाला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.कालव्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या व अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे सांडपाणी थेट कालव्यात जात असल्याने पाणी प्रदूषित होत आहे. याचा गंभीर परिणाम आरोग्यावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रश्नी पाटबंधारे विभागाने कालव्यावरील पूल व भरावांची तत्काळ दुरुस्ती करून पाणीगळती थांबवावी व पाणीचोरी करणाऱ्या आणि त्यांना मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)