शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

पाणीबचतीसाठी आता हवे गावोगावचे ‘वॉटर बजेट’!

By admin | Updated: February 8, 2016 02:11 IST

नद्यांवर धरणे बांधण्यापूर्वी नदीचे पाणी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून वाहत जात होते. पाण्यावर जेवढा वरच्या लोकांचा हक्क आहे, तेवढाच खालच्या लोकांचाही आहे

पुणे : नद्यांवर धरणे बांधण्यापूर्वी नदीचे पाणी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून वाहत जात होते. पाण्यावर जेवढा वरच्या लोकांचा हक्क आहे, तेवढाच खालच्या लोकांचाही आहे. मात्र, तहानलेल्याला पाणी देण्याची संस्कृती विसरून पाण्यावर आपापला हक्क सांगण्याची, वाद घालण्याची विकृती फोफावत आहे. शासनाने गावोगावचे ‘वॉटर बजेट’ करून त्याप्रमाणे पीक पद्धती बदलली पाहिजे, असे मत इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनचे तांत्रिक संचालक प्रा. डॉ. राजेंद्र सराफ यांनी आज येथे व्यक्त केले.दुष्काळाच्या छटा ग्रामीण भागात गडद होत चालल्या असून, धरणसाठ्यातील तोकडे पाणी आगामी पावसाळ्यापर्यंत पुरविण्याचे आव्हान शासन यंत्रणेपुढे आहे. वेगवेगळ्या धरणांचे पाणी अन्य भागाला देण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध होत आहे. विशेषत: राजकीय मंडळी या विषयातही प्रादेशिक राजकारण करून आंदोलनांचा पवित्रा घेत आहेत. या पार्श्वभूमीवर, जलतज्ज्ञ या विषयाकडे कसे पाहतात, हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला.डॉ. सराफ म्हणाले, ‘‘नदी सागराला मिळते. नदीवर धरण बांधण्यापूर्वी नदी खालच्या टोकापर्यंत वाहत जात होती. नदीच्या काठावरील सर्व गावांचा अधिकार या पाण्यावर होता. नैसर्गिकरीत्या पाण्यावर जेवढा नदीच्या वरच्या भागातील लोकांचा हक्क होता, तेवढाच खालच्या लोकांचाही होता आणि आहे. नदीवर धरणे बांधल्याने वरच्या भागात पाणी अडले. त्या पाण्यावर या नदीच्या खालच्या टोकावर राहणाऱ्यांचाही नैसर्गिक हक्क आहे. पाण्यावर पशुपक्ष्यांचाही हक्क आहे.’’(प्रतिनिधी)खरे तर शासनाने तहान लागल्यावर विहीर न खोदता प्रत्येक गावाचे वॉटर बजेट केले पाहिजे. त्यानुसार कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांचे त्या-त्या भागात नियोजन केले पाहिजे. पाऊस भरपूर असेल तेव्हा उसलागवडीला वाव दिला पाहिजे. दर वर्षी शासनाने वॉटर बजेट केले पाहिजे. पाण्याचा कोणत्या कारणासाठी किती वापर होतो, हे तपासण्यासाठी वॉटर फूटप्रिंट काढली पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. सराफ यांनी व्यक्त केली.