शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भादलवाडी तलावात आले पाणी!

By admin | Updated: November 17, 2014 05:19 IST

भादलवाडी (ता. इंदापूर) येथील ब्रिटिशकालीन तलावामध्ये शनिवार (दि. १५) पासून खडकवासला कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे

पळसदेव : भादलवाडी (ता. इंदापूर) येथील ब्रिटिशकालीन तलावामध्ये शनिवार (दि. १५) पासून खडकवासला कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे काही दिवसांत तलावावर येणाऱ्या ‘चित्रबलाक’ पक्ष्यांच्या विणीच्या हंगामाला त्याचा फायदा होणार आहे, असा आशावाद पक्षिप्रेमींनी व्यक्त केला. ‘लोकमत’ने याबाबत शुक्रवारी (दि.७) वृत्त प्रसिद्ध केले होते. तसेच चित्रबलाक पक्ष्यांची वसाहत असणारी बाभळीची झाडे पाणी नसल्यामुळे (पाणीपातळी कमी झाल्यामुळे) उघडी पडली होती. या धर्तीवर तलावात पाणी येऊ लागल्याने पक्षिप्रेमी आनंदात आहेत. भादलवाडी तलाव चित्रबलाक पक्ष्यांचे सारंगगार आहे. दरवर्षी हजारो पक्षी या ठिकाणी विणीच्या हंगामासाठी येतात. परंतु विणीचा हंगाम यशस्वी होण्यासाठी तलावामध्ये भरपूर पाणी असणे गरजेचे असते. पाणी असल्यास चित्रबलाक पक्ष्यांबरोबर विविध ५६ जातींच्या पक्ष्यांना वन्यप्राण्यांपासून धोका निर्माण होत नाही. मात्र मागील पंधरा दिवसांपूर्वी तलावातील पाणीपातळी कमी झाल्याने पक्ष्यांचे आगमन होण्यापूर्वीच ही झाडे उघडी पडली होती. ‘लोकमत’ने याबाबत पाठपुरावा करून वृत्त प्रकाशित केले होेते. त्यानंतर जलसंपदा खात्याने या वृत्ताची दखल घेत शनिवार (दि. १५) सायंकाळपासून तलावात पाणी सोडण्यास सुरुवात केली. पाण्याचा विसर्ग वाढवून तलाव शंभर टक्के भरण्याची मागणी शेतकरी, पक्षिमित्र यांच्याकडून होत आहे. पाण्यामुळे पक्ष्यांसाठी मुबलक खाद्य व निवाऱ्याची सोय होणार आहे.