शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रंगरेषांचा गुणी चित्रकार बनला वॉचमन!

By admin | Updated: June 15, 2017 04:55 IST

रंगरेषांच्या सुरेख मिलाफातून कलाकृती रेखाटण्याचे वरदान लाभले खरे; परंतु परिस्थितीने गांजलेल्या वयोवृद्ध चित्रकाराला पोटाची टिचभर खळगी भरण्यासाठी

- प्रीती जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : रंगरेषांच्या सुरेख मिलाफातून कलाकृती रेखाटण्याचे वरदान लाभले खरे; परंतु परिस्थितीने गांजलेल्या वयोवृद्ध चित्रकाराला पोटाची टिचभर खळगी भरण्यासाठी दिवसभर चित्र रंगवून रात्री इमारतीखाली वॉचमन म्हणून काम करावे लागत आहे. विनोद मंगेशकर या गुणी चित्रकाराच्या आयुष्याची ही संघर्षगाथा!मंगेशकर यांना लहानपणापासूनच चित्रकलेची आवड; पण चित्रकलेचे कोणतेही औपचारिक शिक्षण झालेले नसतानाही चित्रकलेचे गुण त्यांच्यात उपजत होते. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा वैजयंतीमालेचे चित्र रेखाटले होते. पुढे पंडित जवाहरलाल नेहरू यांचे चित्र काढून त्यावर खुद्द त्यांची स्वाक्षरीही घेतली होती. नेहरू यांच्या कौतुकाची थापही मंगेशकरांच्या पाठीवर पडली. त्यानंतरही त्यांनी चित्रकलेचा घेतला वसा न टाकता विविध मान्यवरांसह नैसर्गिक, सांस्कृतिक आदींची पेंटिंग करून चित्रे तयार केली. तरुणपणी त्यांच्या चित्रांचे अनेकांनी कौतुक केले. अनेकांची त्यांची चित्रे नावाजलीदेखील. खिळवून ठेवणाऱ्या त्यांच्या अनेकविध चित्रांना रसिकांची मनसोक्त दादही मिळाली; परंतु वयासोबत अनेक समस्यांनी घेरले. त्यांच्या हृदयाचे आॅपरेशन झाले. सद्य:स्थितीत ते खूप आजारी असतात तरीही रात्रीच्या वेळी वॉचमन म्हणून काम करतात. त्यांची पत्नी धुण्याभांड्याची कामे करून घराला हातभार लावते. त्याच येणाऱ्या तुटपुंज्या पैशातून घराचा खर्च कसाबसा चालवला जातो. आजही ते आपल्या जुन्या चित्रांच्या आठवणीमध्ये रमून जातात. जमतील तशी चित्रे रंगवतात. सचिनला माझे चित्र द्या...मंगेशकर यांनी अनेक दिग्गज नेते, कलाकार, खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते यांच्याबरोबरच प्राणी, पक्षी यांची चित्रे रेखाटली आहेत. असेच एक चित्र त्यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे तयार केले आहे. हे चित्र माझे वय झालेले असल्यामुळे देता येणार नाही; त्यामुळे मी काढलेले हे चित्र सचिनला कोणी तरी नेऊन द्या... अशी हाक ते येणाऱ्या-जाणाऱ्यांना देत आहेत.मदतीसाठी सरसावले...राहुल खिसमतराव आणि भारत जनाज या तरुणांना कलाकाराची ही स्थिती लक्षात आल्यानंतर ते त्याला त्यांच्या परीने मदत करीत आहेत. मंगेशकर यांनी काढलेल्या चित्रांचे आॅनलाईन प्रदर्शन भरवून त्यातून विकल्या जाणाऱ्या चित्रांतून त्यांना आर्थिक मदत करावी, असा त्यांचा विचार आहे.