शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

हजारो लिटर पाणी वाया

By admin | Updated: April 25, 2016 01:55 IST

बारामती तालुक्यातील सुपे येथे मोरगाव प्रादेशिक योजनेद्वारे आलेली जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाण्याची गळती सुरू आहे.

सुपे : बारामती तालुक्यातील सुपे येथे मोरगाव प्रादेशिक योजनेद्वारे आलेली जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाण्याची गळती सुरू आहे. याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, जलवाहिनीची दुरुस्ती चालल्याची माहिती दिली. याबाबत कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा दिसून येत आहे. मागील दोन महिन्यांत हजारो रुपये खर्च करून नव्याने जलवाहिनी टाकण्यात आली आहेत. मात्र, या संदर्भात कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. मागील पंधरवड्यात मोरगावनजीक अशा पद्धतीने पाईप फुटून मोठ्याप्रमाणात पाणीगळती झाली होती. त्यामुळे गेली आठ दिवस त्या भागात पाणीपुरवठा झाला नव्हता. राष्ट्रवादी व्यापार व उद्योगचे तालुकाध्यक्ष संजय दरेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. या वेळी नाझरे पाईपलाईनच्या एअर व्हॉल्व्हमधून मोठ्या क्षमतेने पाण्याची गळती होत असल्याचे दिसून आले. सुपे येथे सध्या आठ दिवसांतून एकदा नळाद्वारे पाणीपुरवठा होत आहे. येथील हातपंप, खासगी विहिरी, बोअरवेल, शासकीय नळ पाणीपुरवठ्यांच्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थ भीषण पाणीटंचाईला सामोरे जात आहेत. सध्या येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. या परिस्थितीत भोंडवेवाडी फाट्यानजीक सुप्याकडे येणाऱ्या नाझरे पाईपलाईनमधून हजारो लिटर पाण्याची गळती होत आहे.