शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

हजारो लिटर पाणी वाया

By admin | Updated: May 29, 2015 00:57 IST

खडकवासला धरणापासून पर्वती जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जाणाऱ्या मुठा कालव्यातून हिंगण्यातील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात गळती होत आहे.

विश्वास खोड ल्ल पुणेपुण्यात पाणी बचतीसाठी पाणीकपातीचे धोरण राबविले जात आहे. असे असतानाही मात्र, खडकवासला धरणापासून पर्वती जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जाणाऱ्या मुठा कालव्यातून हिंगण्यातील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. यामुळे दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ही गळती सुरू आहे. मात्र ही गळती दुरुस्त करण्याऐवजी पाटबंधारे खात्याने महापालिकेलाच जबाबदार धरले आहे. महापालिकेकडून जलशुद्धीकरण केंद्राजवळ पाणी मोजून घेतले जाते. कालव्याच्या मुखापासून पर्वती पायथ्यापर्यंत पाणी येईपर्यंत काही ठिकाणी शेतासाठी, टँकर भरण्यासाठी, वॉशिंग सेंटरसाठी चोरून पाणी वापरले जाते. सध्या सिंचनासाठी आवर्तन सुरू आहे. मात्र हिंगण्याच्या डोंगराळ भागात कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. या गळतीमधून किती पाणी वाया जाऊन नदीत मिळते याचे मापन आजवर झालेले नाही. डोंगराळ भागातून जाणाऱ्या मुठा कालव्याच्या हिंगण्यातील भागात कालवा दुरुस्त करणे अवघड असल्याचा दावा पाटबंधारे विभागाने यापूर्वी केला आहे. या बाबत पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी पालिकेलाच जबाबदार धरले आहे. सिंचनासाठी आवर्तन सुरू नसताना कालव्यातील पाण्याची पातळी कमी असतानाही पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रास प्रतिसेकंद तीनशे क्युसेक्सने पाणी द्यावेच लागते. त्यामुळे पूर्णपणे पाणी सोडणे थांंबविता येणार नाही, असा दावाही अधिकाऱ्यांनी केला आहे.दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यावरून होणाऱ्या पालिका आणि खडकवासला पाटबंधारे विभागातील वादाची चर्चा यंदा फारशी झाली नाही. मात्र, गेल्या वर्षीपेक्षा एक अब्ज घनफूट (टी.एम.सी.) पाणीसाठा अधिक असल्याचा पाटबंधारे विभागाचा दावा असून, पुण्यावर पाणी कपातीची वेळ येणार नाही, असे आश्वासन दिले जात आहे.1पावसाविषयी खात्री नसताना शेतीसाठी सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे पालिकेचे अधिकारी चिंताग्रस्त आहेत. प्रत्यक्षात कालव्यातून गळती होणाऱ्या पाण्याबाबत खडकवासला पाटबंधारे विभागच नव्हे तर तत्कालीन पालक मंत्रीही गंभीर नसल्याचे दिसून आले आहे. दर आवर्तनाच्या वेळी या मुठा कालव्यातून पाणी वाया जात आहे. सध्याही सिंचनासाठी पाणी सोडले जात असताना हिंगणे भागात या कालव्यातून धो-धो पाण्याची गळती होत आहे.2महानगरपालिका पंधरा टी.एम.सी. पाण्यासाठी दरवर्षी २७ कोटी रुपये खडकवासला पाटबंधारे विभागास देते. जलशुद्धीकरण केंद्राजवळ पाणी मोजून घेतले जाते असे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे वाया जाणाऱ्या पाण्यासाठी पाटबंधारे विभागच जबाबदार असून, त्याबाबत काहीही हालचाली होत नसल्याने शेतीसाठी आणि पिण्यासाठी असलेल्या पाण्याची नासाडी अशाच प्रकारे होत राहणार असल्याचे स्पष्ट आहे.