शहरं
Join us  
Trending Stories
1
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
2
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
3
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
4
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
5
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
6
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
7
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
8
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
9
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
10
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
11
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
12
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
13
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
14
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
15
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
16
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
17
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
18
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
20
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण

वारकऱ्यांना चिखल तुडवत काढावा लागतोय मार्ग

By admin | Updated: June 29, 2017 03:29 IST

‘ज्ञानोबा- तुकाराम’चा जयघोष करीत पंढरीच्या विठ्ठलाच्या भेटीची लागलेली ओढ, पाउले चालती पंढरीची वाट, अशा भक्तिमय वातावरणात

लोकमत न्यूज नेटवर्कराजेगाव : ‘ज्ञानोबा- तुकाराम’चा जयघोष करीत पंढरीच्या विठ्ठलाच्या भेटीची लागलेली ओढ, पाउले चालती पंढरीची वाट, अशा भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांना राजेगाव फार्म ते भिगवण स्टेशन रस्त्यावर चिखलातून आणि साचलेल्या पाण्याच्या डबक्यांतून स्वत:ला सावरत-सावरत वाट शोधावी लागते, हे विदारक चित्र आहे.राजेगाव-भिगवण स्टेशन रस्त्यावरील पंढरपूरला जाणारा जवळचा रस्ता म्हणून दौंड- भिगवण रस्त्याने शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा, इनामगाव, तांदळी याशिवाय जुन्नर तालुक्यातील आळे येथूनही दहा-बारा पालख्या या रस्त्यावरून जात आहेत. परंतु, या रस्त्याची झालेली दयनीय अवस्था पाहता, वारकऱ्यांना अतिशय बिकट परिस्थितीत वाट तुडवत प्रवास करावा लागत आहे. अधूनमधून पावसाच्या सरी येत असल्याने शेतकरी सुखावला आहे. मात्र, पावसामुळे राजेगाव-भिगवण रस्त्यावर शिंग्रोबामाळ परिसरात होळकरओढ्यादरम्यान पडलेल्या खड्ड्यात साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर तळी साचल्याने प्रवाशांना व वारकऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागला. दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील राजेगाव, नायगाव, वाटलूज, मलठण या गावांतील लोकांना भिगवण ही मुख्य बाजारपेठ असल्याने दैनंदिन व्यवहार व आठवडे बाजाराला या रस्त्यावरून भिगवणकडे यावे लागते. या भागात पावसाची रिपरिप सुरू झाली, की रस्त्यावर सर्वत्र चिखलाचा राडा आणि रस्त्यावरील खड्ड्यात पाण्याची तळी साचलेले चित्र पाहायला मिळते. राजेगाव फार्म चौफुला ते शिंग्रोबामाळादरम्यान ‘रस्त्यावर खड्डा की खड्ड्यात रस्ता?’ असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली होती. या रस्त्यावरून दररोज प्रवास करणारे प्रवासी, नोकरदार व विद्यार्थी या रस्त्यावरून दररोजचा प्रवास करून मेटाकुटीला आले आहेत. पावसाळा सुरू झाला, की वर पावसाची रिपरिप आणि खाली चिखलाचा राडा व पाण्याची झालेली तळी, यामुळे अनेक प्रवाशांच्या मोटारसायकल घसरून किरकोळ स्वरूपात अपघात झाले. या रस्त्याच्या दुतर्फा रस्त्याला अगदी लगत बागायती क्षेत्र आहे. जमिनीतील निचऱ्याचे पाणी जायला रस्त्याच्या कडेला असणाऱ्या चाऱ्या शेतकऱ्यांनी कधीच बुजवून टाकल्या आहेत. या रस्त्यावरून होणारी ओव्हरलोड वाळूवाहतूक त्यामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. दरम्यान, आमदार राहुल कुल यांनी राजेगाव येथे एका मेडिकल स्टोअर्सच्या उद्घाटनप्रसंगी या रस्त्याला पाच कोटींचा निधी मंजूर झाला असल्याचे जाहीर केले. त्यामुळे या रस्त्याला प्रत्यक्ष कधी सुरुवात होते, याकडे लक्ष लागले आहे.