शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वारकरी विद्यार्थ्यांना उलट्या, जुलाबाचा त्रास

By admin | Updated: November 21, 2014 04:01 IST

शेंगदाणे समजून एरंडाच्या बिया खाल्ल्याने वारकरी शिक्षण घेणाऱ्या १२

पिंपरी : शेंगदाणे समजून एरंडाच्या बिया खाल्ल्याने वारकरी शिक्षण घेणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना उलट्या व जुलाबाचा त्रास झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास तळेगाव-चाकण रस्त्यावरील इंदोरीजवळील भंडारा डोंगर येथे घडली. दत्ता गुरसुले (वय १४), ऋषीकेश शेखर सोलर (१३), जानकू खैरमोडे (१७), चैतन्य मुजाराम इंगळे (१०), हरिओम कांबळे (१०), कृष्णा बाबासाहेब कथाळे (१२), आनंद शंकर सोलार (१०), ज्ञानेश्वर पांगरे (११), अर्जुन सोमनाथ ढोले (११), उमेश राधाकृष्ण शिंदे (१०), ज्ञानेश्वर बाबूराव पितळे (१०), अनिल बलावर (१४, सर्व रा. ज्ञानवैष्णव वारकरी शिक्षण संस्था, दादेगाव, पैठण, औरंगाबाद) अशी त्रास झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. ज्ञानवैष्णव वारकरी शिक्षण संस्थेतील ३० ते ३५ जण कार्तिक वारीसाठी १६ नोव्हेंबरला आळंदीला आले होते. बुधवारी सायंकाळी साडेचारला हे सर्व वारकरी आळंदीहून भंडारा डोंगरावर दर्शनासाठी आले होते. येथील दर्शन घेऊन निघाले असताना संस्थेतील दहा ते बारा विद्यार्थ्यांनी शेंगदाणे समजून एरंड बिया खाल्ल्या. त्यामुळे त्यांना मळमळणे, उलट्या, जुलाब होण्याचा त्रास होऊ लागला. उपचारासाठी या सर्व मुलांना सायंकाळी सातच्या सुमारास चाकण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर रात्री साडेअकराला त्यांना वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. इंगळे, कांबळे, कथाळ, सोलार, पांगरे, ढोले, शिंदे व पितळे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना गुरुवारी सकाळी रुग्णालयातून सोडण्यात आले. तर गुरमुले, सोलार, खैरमोडे आणि बलावर यांना गुरुवारी दुपारी रुग्णालयातून सोडण्यात आले. सर्वांची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (प्रतिनिधी)