शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

वानवडीत तरुणावर वार

By admin | Updated: July 1, 2014 00:02 IST

किरकोळ कारणावरून तरुणावर धारदार हत्याराने वार करण्यात आल्याची घटना वानवडीमध्ये रविवारी रात्री घडली.

पुणो : किरकोळ कारणावरून तरुणावर धारदार हत्याराने वार करण्यात आल्याची घटना वानवडीमध्ये रविवारी रात्री घडली. ही भांडणो सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावरही हल्ला करण्यात आला. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तुषार श्यामराव शेलार (वय 21, रा. आदर्शनगर, हांडेवाडी रस्ता, हडपसर) व शुभम बंड अशी जखमींची नावे आहेत. 
या प्रकरणी स्वप्नील रायकर, शुभम रायकर या दोघांसह चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेलार याचे दुकान रायकर याने भाडय़ाने घेतलेले आहे. या दुकानावरून दोघांमध्ये वाद झाले होते. रविवारी रात्री शेलार हा बंड याच्यासोबत काळेपडळ येथील हॉटेल जयभवानीसमोर गप्पा मारत उभा  होता. 
त्या वेळी त्याच्या मोबाईलवर एक फोन आला. शेलार याला मैदानात ये असे सांगण्यात आले. त्यानुसार, शेलार आणि बंड हॉटेलमागील मैदानामध्ये गेले. तेथे मित्रशी बोलत असतानाच स्वप्नील आणि शुभम तेथे आले. त्यांनी शेलारशी वाद घालायला सुरुवात केली. 
त्या वेळी या दोघांनी धारदार हत्याराने शेलारवर हल्ला चढवला. ही भांडणो सोडविण्यासाठी गेलेल्या बंड याच्यावरही आरोपींनी वार केले. गंभीर जखमी झालेल्या या दोघांना नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.  (प्रतिनिधी)
 
घायवळ टोळीतील 5 जणांना कोठडी
4पुणो : येरवडा कारागृहात कुख्यात गुंड नीलेश घायवळ याची तपासणी केल्याचा राग मनात धरून हवालदाराला मारहाण केल्याप्रकरणी घायवळ टोळीतील 5 जणांची रवानगी न्यायालयाने येरवडा कारागृहात केली आहे. 
4मोंटय़ा ऊर्फ मनोज ऊर्फ मोन्या देवराम भिलारे (वय 22, रा. दारवली, ता. मुळशी), सागर ऊर्फ अमर राजेंद्र वेलापूरकर (वय 21, रा. कव्रेनगर, कोथरूड), चिंटय़ा ऊर्फ अजय आनंद पवार (वय 21, रा. कोथरूड चौक), टिन्या ऊर्फ नीलेश अभिमन्यू सोनवणो (वय 22, रा. वारजे माळवाडी) आणि महेश ऊर्फ राकेश गुलाब कुंबरे (वय 19, रा. शास्त्रीनगर, कोथरूड) अशी आरोपींची नावे आहेत.  
4या प्रकरणात संतोष धुमाळ याला पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही. प्रकाश परशुराम धुमाळ (वय 49, रा. जेल वसाहत) यांनी फिर्याद दिली आहे. नागपूर चाळ येथील फेमस क्लॉथ सेंटरसमोर 23 मे रोजी दुपारी 1.3क् वाजता ही घटना घडली. फिर्यादी हे येरवडा कारागृहात हवालदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी घायवळची झडती घेतली होती. त्या वेळी धुमाळ व घायवळ यांच्यात बाचाबाची झाली होती. याचा राग मनात धरून घायवळ टोळीतील 5 जणांनी फिर्यादींना रस्त्यात अडवून मारहाण केली होती.