शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीमुळे घटले इच्छुक

By admin | Updated: November 15, 2016 02:56 IST

अर्थकारणातून राजकारण व राजकारणातून अर्थकारण असे समीकरण मांडत राजकारणात येणाऱ्यांना नोटा बंदीच्या निर्णयाचा जबरदस्त झटका बसला आहे.

लोणावळा : अर्थकारणातून राजकारण व राजकारणातून अर्थकारण असे समीकरण मांडत राजकारणात येणाऱ्यांना नोटा बंदीच्या निर्णयाचा जबरदस्त झटका बसला आहे. यामुळेच की काय ‘लक्ष्य २०१६’ म्हणून सोशल मीडियावर मागील काही काळापासून चर्चेत असणाऱ्या अनेक इच्छुकांनी आपली उमेदवारी बिनशर्त मागे घेतल्याने राजकीय पक्षदेखील अडचणीत आले आहेत. पक्षांकडे इच्छुकांची वानवा भासू लागल्याने त्यांच्यावर इच्छुकांची मनधरणी करून उमेदवारी देण्याची वेळ आली आहे.महिनाभरापासून लोणावळ्यात नगर परिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले व राजकीय पक्षांकडून इच्छुकांची चाचपणी सुरू झाली. भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, आरपीआय, मनसे यांनी इच्छुकांच्या मुलाखतींचे सत्र सुरू केले. मात्र, अर्थकारणावर गदा आल्याने उमेदवारांची संख्या घटू लागली. त्यामुळे उमेदवार जाहीर करण्यात राजकीय पक्षांकडून चालढकल होऊ लागली आहे. त्यातच लोणावळ्यात सर्वच राजकीय पक्षांकडे नेतृत्वाचा अभाव असल्याने बहुतांश सर्वच पक्षांना उमेदवार मुलाखती व याद्या जाहीर करण्यासाठी मावळ व जिल्ह्यातील इतर पुढाऱ्यांच्या पाया पडण्याची नामुष्की ओढवली आहे. ती मंडळी त्यांच्या सोयीनुसार वेळ देत असल्याने उमेदवारीअर्ज भरण्यास ११ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असतानाही काही राजकीय पक्षांचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत.लोणावळ्याच्या निवडणुका या मोठ्या प्रमाणात अर्थकारणावर चालतात, हा इतिहास आहे. निवडणूक लढविण्यासाठी आयोगाने नेमून दिलेली खर्चाची मर्यादा अडीच लाख रुपये असली, तरी प्रत्यक्षात काळ्या पैशांच्या माध्यमातून किमान ५० लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत खर्च करण्याची तयारी उमेदवार करीत असतात. या वेळी देखील अनेक इच्छुकांनी ती तयारीही ठेवली होती. त्याकरिता मोठ्या प्रमाणात पैसा साठविण्यात आला होता. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातून हजार व पाचशे रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केल्याने कोटीची भाषा करणाऱ्यांवर चहा पिण्यासाठीही इतरांवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच की काय पण इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून, ‘मिशन २०१६’ म्हणणारे चौकात फिरकायचेदेखील बंद झाले आहेत.नोटाबंदीच्या निर्णयामुळे काही इच्छुकांनी तलवारी म्यान केल्या असल्या, तरी मुरब्बी राजकारण्यांनी या संधीचा फायदा उचलत आर्थिक गणिते बांधत प्रचार सुरू केला आहे. हजार व पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बंद झाल्या असल्या, तरी त्या ३० डिसेंबरपर्यंत बँकांमध्ये स्वीकारल्या जाणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य मतदारांमध्ये निवडणुकीत हा काळा पैसा वाटप करीत स्वत:चे हात स्वच्छ करण्यासोबत मतदार राजाला खूश करण्याचे आडाखे बांधले जाऊ लागले आहेत. सर्वसामान्य जनतेला त्याच्या बँक खात्यात अडीच लाख रुपयांपर्यंत पैसे भरण्याची मुभा असल्याने मतदारदेखील पैसे स्वीकारण्याच्या मन:स्थितीमध्ये असल्याची सर्वसाधारण चर्चा आहे. नोटाबंदीच्या या निर्णयानंतर निवडणूक आयोग व पोलीस प्रशासन या काळ्या पैशाला कसे रोखणार याकडे सध्या सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (वार्ताहर)