शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती!

By admin | Updated: April 25, 2016 02:44 IST

दिवसेंदिवस वाढत चाललेली उन्हाची तीव्रता आणि पावसाळा सुरू होण्यास अजून दीड ते पावणेदोन महिने आहेत. मात्र भोर तालुक्यातील भाटघर धरणात फक्त १२ टक्के तर नीरा

भोर : दिवसेंदिवस वाढत चाललेली उन्हाची तीव्रता आणि पावसाळा सुरू होण्यास अजून दीड ते पावणेदोन महिने आहेत. मात्र भोर तालुक्यातील भाटघर धरणात फक्त १२ टक्के तर नीरा देवघर धरणात १६ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे दोन्ही धरण भागात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई सुरू झाली आहे. टँकरची मागणी करून दीड महिना झाला तरी अद्याप एकही टँकर सुरू करण्यात आला नाही. त्यामुळे नागरिकांची व जनावरांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. टँकर सुरू करा. अन्यथा हंडा मोर्चा काढून आंदोलन करण्याचा इशारा दोन्ही धरण भागातील संतप्त नागरिकांनी दिला आहे. भोर तालुक्यात २०१५ मध्ये पाऊस कमी प्रमाणात झाल्याने दोन्ही धरणे पूर्ण क्षमतेने न भरता ७० टक्केच भरली होती. तरीही भाटघर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी खाली सोडल्याने धरणातील पाणीसाठा अत्यंत कमी झाला असून, यामुळे पाण्याचा खांडवा कुरुंजी गावाच्या खाली आला आहे. पावसाळा सुरू होण्यास अद्याप दीड महिना असून, धरणातील पाणीसाठा अत्यंत कमी झाल्याने दोन्ही धरण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. धरणाचा खांडवा मळे गावापर्यंत आला असून, पाणी गावापासून दोन ते तीन किलोमीटरवर गेले आहे. यामुळे अनेक गावांत दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. यामुळे अनेकदा गाळमिश्रित पाणीपुरवठा होत असून यामुळे साथीचे आजार वाढत आहेत. तर दोन मोटारीमुळे वीजबिल अधिक प्रमाणात येत आहे. मात्र आता धरणात पाणीच नसल्याने टँकरशिवाय कोणताच पर्याय नाही. (वार्ताहर)भाटघर धरणातील पाणीसाठा अत्यंत कमी झाल्याने धरणात असणाऱ्या विहिरी कोरड्या पडत असल्याने माजगाव, हर्णस, जोगवडी, आस्कवडी, डेरे, म्हशीवली, कांबरे खुर्द, कांबरे बु., कुरुंजी यांसह अनेक गावांतील विहिरीतील मोटारी बंद पडल्या आहेत. त्यामुळे दुसरी मोटर घेऊन सदरची मोटार विहिरीपासून धरणाच्या पात्रापर्यंत एक ते दोन किलोमीटरवर पाण्यात टाकून ते पाणी विहिरीत सोडून उचलले जात आहे. नीरा देवघर धरण भागातील रिंगरोड धारांबे, पऱ्हर खुर्द, पऱ्हर बु., निवंगण, धानवली, शिरवली हि.मा., चौधरीवस्ती, कुडली खुर्द, कुडली बु., दुर्गाडी तर महाड-पंढरपूर रोडवरील शिरगाव, सोमजाई वस्ती, सुईरमाळ, कारुंगण, शिरगाव, शिळिंब, अशिंपी, उंबार्डेवाडी यांसह अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे.