शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पाकीट केले परत

By admin | Updated: January 11, 2017 02:07 IST

आपण नेहमीच म्हणत असतो, पैशाच्या व संपत्तीच्या हव्यासापोटी रक्ताचं नातं रक्ताला ओळखेनासं झालं आहे. परंतु समाजात अशी काही व्यक्तिमत्त्वं

शेळपिंपळगाव : आपण नेहमीच म्हणत असतो, पैशाच्या व संपत्तीच्या हव्यासापोटी रक्ताचं नातं रक्ताला ओळखेनासं झालं आहे. परंतु समाजात अशी काही व्यक्तिमत्त्वं असतात की, जी पैशापेक्षा इतरांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन ती सोडविण्यासाठी पुढाकार घेऊन समाजासमोर एक चांगला आदर्श घालून देत आहेत. आळंदी देवाची येथील पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या संजय महादेव प्रभुणे हे दुचाकीवरून जात असताना प्रवासादरम्यान त्यांच्या खिशातील पाकीट व त्यात असणारे दीड ते दोन हजार रुपये व त्याहीपेक्षा किमती वस्तू म्हणजे त्यात असणारे पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स, आधारकार्ड, एटीएम कार्ड आदींसह महत्त्वाची कागदपत्रे असलेले भरगच्च पाकीट रस्त्यात पडले.रस्त्यावर वाहनांसह पायी प्रवास करणाऱ्यांची तोबा गर्दी. अशा गर्दीत संजय महादेव प्रभुणे यांचे नकळत रस्त्यावर पडलेले पाकीट हे येथील सद्गृहस्थ जगन्नाथ पांडुरंग जाधव यांना दिसले. त्यांनी ते उचलले व त्यात काय आहे काय नाही, या स्वार्थी वृत्तीकडे न पाहता थेट जवळच असणाऱ्या आळंदी देवाची पोलीस स्टेशन येथील कामावर असणारे ठाणे अंमलदार अरुण भोसले यांच्या स्वाधीन केले. मला हे पाकीट आत्ताच चौकात सापडले असून, ज्याचे असेल त्याला खुशाल देऊन टाकण्यास त्यांनी सांगितले. पोलिसांनी ते पाकीट सर्वांसमोर उघडले असता त्यात रोख १५७० रुपये व महत्त्वाची कागदपत्रे मिळून आली. आधारकार्डवरून प्रभुणे यांचा शोध घेतल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेऊन जगन्नाथ पांडुरंग जाधव यांच्या समक्ष त्यांना पाकीट स्वाधीन करण्यात आले.या वेळी ठाणे अंमलदार अरुण भोसले, पोलीस हवालदार पृथ्वीराज पाटील, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.