शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी भागाला पाण्याची प्रतीक्षा

By admin | Updated: April 29, 2017 03:47 IST

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात डिंभे येथे सुमारे साडेतेरा टीएमसीचा डिंभे धरण प्रकल्प उभा राहिला. यामुळे प्रकल्पाच्या

डिंभे: आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात डिंभे येथे सुमारे साडेतेरा टीएमसीचा डिंभे धरण प्रकल्प उभा राहिला. यामुळे प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील सुमारे ७४४८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊन पुणे व नगर जिल्ह्यातील भाग सुजलाम् सुफलाम् झाला. परंतु प्रकल्पासाठी जमिनी देऊन आपल्या सर्वस्वाचा त्याग करणारे भूमिपुत्र मात्र अजूनही डिंभे धरणाच्या पाण्यापासून वंचित आहेत. या प्रकल्पामुळे विस्थापित झालेली अनेक पुनर्वसित गावांमध्ये आजही मूलभूत सुविधांची वानवा आहे. काही कुटुंबे अजूनही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. आपल्या सर्वस्वाचा त्याग करून या प्रकल्पामुळे देशोधडीला लागलेल्यांना आपल्या पुढील पिढीला तरी एक ना एक दिवस डिंभे धरणाचे पाणी चाखावयास मिळेल, या आशेवर जगत आहे. मात्र चार दशके सरली अजून तरी त्यांची ही महत्त्वाकांक्षा पूर्ण झाली नाही. डोंगराच्या तळाशी पाणी दिसत आहे. मात्र त्याचा जीवनात उपयोग होत नसल्याने या भागातील जनता कासावीस झाली आहे. धरण प्रकल्प उभा राहिल्यापासून आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागाला डिंभे धरणातून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र अजून तरी या मागणीला मूर्त रूप आले नसल्याने आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागाला डिंभेच्या सिंचनाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात पावसाळ््यात हजारो मिमी पाऊस पडतो. या पाण्याच्या जोरावर डिंभे बुद्रुक येथे सन १९७२ मध्ये घोड नदीवर सुमारे ८५२ मीटर लांबीचे व ७२ मीटर उंचीचे धरण बांधण्यात आले आहे. १३.५० टीएमसीएवढे पाणी साठवणक्षमता असणाऱ्या या धरणामुळे नगर व पुणे जिल्हयातील सुमारे ७४४८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. ११६ किमी लांब असणाऱ्या उजव्या कालव्याद्वारे आंबेगाव व शिरूर तालुक्यातून अनुक्रमे ८६६१ व ६९०७ सिंचनक्षेत्र प्रस्तावित झाले आहे. या धरणासाठी आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील आंबेगाव, वचपे, कळंबई, फुलवडे, बोरघर, माळीण, अडिवरे, पंचाळे, असाणे, कोकणेवाडी, कोलतावडे, बेंढारवाडी, पाटण, महाळुंगे, कुशिरे बुद्रुक, कुशिरे खुर्द साकेरी, पिंपरी आदी आदिवासी गावे पूर्णत: व अंशत: बाधित होऊन धरणाच्या पाण्यात बुडाली. या गावांतील आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी धरणाच्या पाण्याखाली गेल्याने हजारो कुटुंबे बेरोजगार होऊन कायमची निराधार झाली आहेत.डिंभे धरणाचे पाणी विनासायास इतर तालुक्यांना मिळते. तर मग आमच्याच हक्काचे पाणी अम्हाला का मिळू नये? वर्षानुवर्षे मागणी करूनही या भागातील भुमिपुत्रांना डिंभे धरणाच्या पाण्यापासून वंचित ठेवले जात आसल्याने शेतकरीवर्गामध्ये असंतोषाची भावना निर्माण होऊ लागली आहे. (वार्ताहर)