शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पालिका प्रभागरचनेची प्रतीक्षा आता काही दिवसांचीच..!

By admin | Updated: July 29, 2016 03:57 IST

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या प्रभागरचनेकडे डोळे लावून बसलेले विद्यमान नगरसेवक तसेच निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना आता काही दिवसच प्रतीक्षा करावी

पुणे : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या प्रभागरचनेकडे डोळे लावून बसलेले विद्यमान नगरसेवक तसेच निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना आता काही दिवसच प्रतीक्षा करावी लागणार आहे. ३१ जुलैपर्यंत निवडणूक आयोगाकडून प्रभागरचना व आरक्षण सोडतीबाबतचे वेळापत्रक जाहीर होईल. त्यानंतर लगेचच प्रभाग रचनेच्या कामाला सुरुवात होईल.पालिकेच्या निवडणूक विभागाकडूनच याचे संकेत देण्यात आले. पुणे पालिकेसह राज्यातील १० महापालिकांची सार्वत्रिक निवडणूक पुढील वर्षाच्या सुरुवातीला होत आहेत. मुंबई वगळता अन्य सर्व पालिकांसाठी राज्य सरकारने चार वॉर्डांचा एक प्रभाग अशी नवी पद्धत जाहीर केली आहे. यात सर्व महापालिकांची प्रभागरचना नव्याने होईल. निवडणुकीसाठी अवघे काही महिने शिल्लक राहिलेले असताना प्रभाग रचनेबाबत मात्र काहीच हालचाल होत नव्हती. बहुतेकांची राजकीय गणिते त्यावर अवलंबून असल्याने ते याची वाट पाहत होते.आयोगाने यापूर्वी सर्व पालिकांच्या निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना प्रभागरचनेसाठी गुगल मॅपचा उपयोग करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतर याबाबत काहीच हालचाल होत नव्हती. आता आयोगाकडून प्रभागरचना व प्रभागांची आरक्षण सोडत याचा कार्यक्रमच जाहीर होईल. त्यात प्रारूप प्रभागरचना कधी करायची, त्यावर हरकती, सूचना कधी मागवायच्या, त्याची सुनावणी कधी घ्यायची, अंतिम प्रभागरचना कधी जाहीर करायची, त्यानंतर त्याची आरक्षण सोडत कधी काढायची याचे वेळापत्रक असेल. त्यानुसार लगेचच कामाला सुरुवात होईल. साधारण २३ आॅगस्टपर्यंत अंतिम प्रभागरचना जाहीर होईल, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.