खळद : राज्यात सर्वत्र डेंग्यूने थैमान मांडले आहे. असे असताना याला आळा बसावा म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्याची गरज आहे. मात्र, खळद व परिसरातील गावांमध्ये याबाबत प्रशासनाची उदासीनता असून धुरळणी करण्यासाठी प्रशासन मुहूताची प्रतीक्षा करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणो आहे.
खळद येथे दोन वर्षापूर्वी ग्रामपंचायतीने यासाठी धुरळणी फवारणीची मशीन खरेदी केली आहे. तर काही गावांना या मशीनही नसल्याचे समजत आहे. खळद येथे मशीन असली तरी आत्तार्पयत एखादीच फवारणी झाली असेल. आता सध्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असताना धुरळणीची फवारणी अथवा नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाय सांगण्याची आवश्यकता असताना खळद ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व आरोग्य विभाग शांत आहे.
त्यांना या फवारणीसाठी मुहूर्तच मिळत नसल्याचे दिसत आहे. याबाबत नागरिकांमध्ये संताप असून हे गावकारभारी कोणाच्या आदेशाची वाट पाहत आहेत, असा सवाल केला जात आहे. या भागात एखादा डेंग्यूचा रूग्ण सापडावा याची प्रशासन वाट पाहत आहेत का? असा सवालही केला जात आहे.
खळद येथील ग्रामसेवक पी. टी. पवार यांच्याशी चचर्ा केली असता, आम्ही पंधरा दिवसांपूर्वीच तालुका आरोग्य अधिका:यांना पत्र देवून या फवारणीसाठी औषधाची मागणी केली होती.
परंत,ु त्यांनी औषध उपलब्ध नसल्याचे सांगितले. या बाबत आरोग्य विभागाशी संपर्क केला असता त्यांनी आपण संबधित ग्रामपंचायतींना औषधाची खरेदी करून त्यांची फवारणी करावी असे सांगितल्याचे सांगण्यात आले.
तालुका गटविकास अधिका:यांनीही ग्रामपंचायतींनी या औषधाची खरेदी करून फवारणी करावी, असे पत्र दिल ेअसल्याचेही समजते.
धुरळणीसाठी
औषध कोणाचे?
सध्या डेंग्यूला आळा बसणो गरजेचे असताना या फवारणीच्या औषधासाठी चालढकल होत असल्याचे दिसत आहे. आजर्पयत शासन या औषधाचा पुरवठा करीत होते व आता या औषधाची खरी गरज असताना शासकीय पातळीवर या औषधाचा तुटवडा कसा? असा प्रश्न नागरिक विचारीत आहेत. लोकप्रतिनिधीही याबाबत काही प्रय} करीत नसल्याचे नागरिकांचे म्हणणो आहे.