शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

दिवसा वेटर अन् रात्री दरोडेखोर

By admin | Updated: February 11, 2016 03:07 IST

दिवसा चायनीज हॉटेलांमध्ये वेटरचे काम आणि रात्री लूटमार करणाऱ्या नेपाळी तरुणांच्या टोळीला, दरोड्याच्या तयारीत असताना पिंपरी पोलिसांच्या पथकाने पकडले. त्यांच्याकडून

पिंपरी : दिवसा चायनीज हॉटेलांमध्ये वेटरचे काम आणि रात्री लूटमार करणाऱ्या नेपाळी तरुणांच्या टोळीला, दरोड्याच्या तयारीत असताना पिंपरी पोलिसांच्या पथकाने पकडले. त्यांच्याकडून दोन दुचाकी, तसेच दरोड्यासाठी वापरण्यात येणारी हत्यारे हस्तगत करण्यात आली आहेत. पाच आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांचा म्होरक्या राकेश फरार झाला आहे. पोलीस कर्मचारी चपाईतकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीच्या मागावर पोलीस पथक होते. पाच ते सहा जणांचे टोळके केएसबीकडून मोरवाडीकडे जाणाऱ्या पुलाच्या बांधकामाजवळ दबा धरून थांबले होते. त्यांना पोलिसांनी जेरबंद केले. प्रेम अमर सुनाडी (वय १९), लोकेश दीपक ठाकूर (वय १९), मंगल लालबहादूर परिहार (वय १९), लक्ष्मण ऊर्फ लकी शंकर कामी (वय २१), सागर बिरबहादूर दमाई (वय २४), सागर बिरबहादूर दमाई (वय २४, सर्व मूळचे नेपाळ, सध्या रा. डांगे चौक, वाकड) या आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांचा एक साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पिंपरी, चिंचवड, वाकड, हिंजवडी, भोसरी परिसरात रात्री नागरिकांची लूटमार, तसेच घरफोड्या करून त्यांनी दहशत पसरवली होती. त्यांच्याकडून ३ कुकरी, एक चॉपर, एक चाकू, मिरची पावडर, नायलॉन दोरी, मोबाइल, तसेच दोन दुचाकी असा ८३ हजारांचा माल हस्तगत करण्यात आला.परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त बसवराज तेली, सहायक पोलीस आयुक्त मोहन विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, विश्वजित खुळे, बुचडे व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली. (प्रतिनिधी)नेपाळी तरुणांची टोळीदिवसा चायनीज हॉटेलमध्ये वेटरचे काम करणारे नेपाळी तरुण रात्री मात्र रस्त्यावर एकट्या नागरिकास अडवून लुबाडणूक करत होते. घरफोड्या, दरोडे टाकत होते. दरोड्याच्या तयारीत असताना, ते पोलिसांच्या हाती लागले. त्यामुळे त्यांचे गुन्हेगारी कृत्य उघडकीस आले. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.