शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

वाघोलीची वॉर्डरचना, आरक्षण जाहीर

By admin | Updated: June 28, 2017 04:17 IST

सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या वाघोली ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची वॉर्डरचना व आरक्षण जाहीर करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाघोली : सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या वाघोली ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची वॉर्डरचना व आरक्षण जाहीर करण्यात आले. ३४ गावांचा महापालिकेत समावेश होणाऱ्या गावांमध्ये वाघोलीचादेखील समावेश असल्याने आगामी निवडणुकीबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.वाघोली ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक चालू वर्षाच्या डिसेंबरमध्ये होऊ घातली आहे. त्यानुसार महसूल विभागाच्या वतीने मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये वॉर्डरचना व आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. १७ सदस्यसंख्या असलेल्या वाघोली ग्रामपंचायतीचा पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या ग्रामपंचायतीमध्ये समावेश होतो. पुणे शहरालगत असल्याने सुमारे दीड लाखाच्या आसपास नागरिकांचे वास्तव्य आहे. मंडलाधिकारी शिवाजी जाधव व तलाठी संजय भोर यांच्या उपस्थितीमध्ये वॉर्डरचना व आरक्षण जाहीर करण्यात आले. या वेळी उपस्थित बहुतांश नागरिकांनी या सोडतीवर समाधान व्यक्त केले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी वॉर्डरचनेला ३ जुलैपर्यंत उपलब्ध करण्यात येईल, तर आक्षेप असणाऱ्या नागरिकांना हरकत घेण्यासाठी ४ ते ११ जुलैपर्यंत वेळ देण्यात आला आहे. जुन्या वॉर्डरचनेनुसार सर्वात मोठा असणाऱ्या सहा क्रमांकाच्या वॉर्डचे नवीन वॉर्डरचनेमध्ये विभाजन करून काही भाग वॉर्ड क्रमांक एक व पाचला जोडण्यात आला आहे. भौगोलिकदृष्ट्या वॉर्ड क्रमांक पाच आलेल्या व एक मोठे वॉर्ड झाले आहेत. लोकसंखेच्या अनुमानाने वॉर्ड क्रमांक एक व सहा मोठे होणार आहेत. वॉर्ड क्रमांक एकमध्ये गेल्यावेळी २ सदस्य होते. या वेळी वॉर्ड क्रमांक दोनमध्ये २ सदस्य आहेत, तर वॉर्ड क्रमांक एकमध्ये ३ सदस्य आहेत.एकीकडे महापालिकेमध्ये वाघोलीचा समावेश करण्यामध्ये सकारात्मक असताना पंचवार्षिक निवडणूक घेण्याच्या दृष्टीने महसूल विभाग कार्यरत झाला आहे. महापालिकेमध्ये समाविष्ट होत असलेल्या गावामधील वॉर्डनिहाय आरक्षणामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. ३४ गावांबद्दल शासन सकारात्मक असताना वाघोलीची वॉर्डनिहाय रचना व आरक्षण जाहीर झाल्याने नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.