शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

‘वाघोली ते लोणी कंद’ सात किलोमीटरचा दुमजली पूल होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे-नगर महामार्गावरील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी वाघोली ते लोणी कंद मार्गावर सात किलोमीटरचा दुमजली पूल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे-नगर महामार्गावरील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी वाघोली ते लोणी कंद मार्गावर सात किलोमीटरचा दुमजली पूल बांधणार असल्याची घोषणा केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी केली. या पुलाचे आरेखन पूर्ण झाले असून यासाठी वेगळे भूसंपादन करण्याची गरज नाही. त्यामुळे सहा महिन्यांत काम चालू होईल, असे गडकरी म्हणाले.

पुणे-नगर या रस्त्याप्रमाणेच पुढे औरंगाबादपर्यंतचा रस्ताही ‘डायरेक्ट अॅक्सेस रोड’ केला जाणार आहे. हा सहा हजार कोटी रुपयांचा प्रकल्प असल्याचे गडकरी यांनी सांगितले. शनिवारी (दि. १३) चांदणी चौकातील रखडलेल्या पुलाच्या कामाची पाहणी केल्यानंतर गडकरी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांना त्यांनी ही माहिती दिली.

गडकरी म्हणाले की, दुमजली पूल झाल्यानंतर वाघोली ते लोणी कंद या मार्गावर सोळा मार्गिकांमधून (लेन) वाहतूक सुरु होईल. यामुळे वाहतूक वेगाने पुढे सरकेल. या पुलावरील सर्वात वरचा मार्ग सहा ‘लेन’चा, मधला मार्ग चार ‘लेन’चा, तर जमिनीवरचा मार्ग आताप्रमाणेच चार ‘लेन’चा असणार आहे. पुणे-नगर या रस्त्याप्रमाणेच नगर-औरंगाबाद या मार्गाचेही डायरेक्ट अॅक्सेस डिझाईन करण्याची सूचना केली असल्याचे गडकरी यांनी सांगितले. तसेच तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील ५४ किलोमीटरच्या महामार्गाला गती दिली आहे. यासाठी सहाशे कोटी रुपये मंजूर केले असून लवकरच काम चालू होईल, असेही ते म्हणाले.

चौकट

सातारा रस्त्याचे काम मार्चमध्ये होणार पूर्ण

“पुणे-सातारा रस्त्यावरील चारपैकी तीन पुलांचे काम पूर्ण झाली आहेत. उर्वरित रखडलेली काम येत्या मार्चअखेर पूर्ण होतील,” असे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. या कामातल्या दिरंगाईला अ‍ॅक्सिस बँक जबाबदार होती. त्यांनी करारभंग केल्याने कंत्राटदाराला पैसे दिले गेले नाहीत आणि काम रखडले. या बँकेवर कारवाई करण्याचे पत्र मी संबंधितांना दिले आहे. तसेच तूर्तास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पैसे देऊन प्रलंबित कामे पूर्ण करावीत, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे येत्या मार्चअखेर ही कामे पूर्ण केली जातील, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

चौकट

भक्तिमार्गासाठी बारा हजार कोटी

आळंदी-पंढरपूर आणि देहू-पंढरपूर या दोन्ही पालखी महामार्गांवरील अपूर्ण कामे पूर्ण करण्यास माझे प्राधान्य आहे. येत्या दीड वर्षात बारा हजार कोटी रुपये खर्च करुन या दोन्ही महामार्गांची कामे पूर्ण केली जातील. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आणि खासदार गिरीश बापट यांची वेळ घेऊन भूमिपूजनाची तारीख निश्चित करण्याची सूचना केली आहे. हे दोन्ही मार्ग केवळ महामार्ग न होता ‘भक्तिमार्ग’ बनावेत असा प्रयत्न आहे. या दृष्टीने महामार्गावर संतवचने असतील, संत ज्ञानेश्वर-तुकाराम यांच्या अभंगांमध्ये उल्लेखलेल्या वृक्षवल्लींची लागवड महामार्गाच्या बाजूने केली जाईल. अनवाणी चालताना वारकऱ्यांचे पाय भाजू नयेत यासाठी काही करता येईल का, असाही प्रयत्न केला जातो आहे.