शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

उत्साहामुळे वाढला मतदानाचा टक्का

By admin | Updated: October 16, 2014 06:18 IST

पिंपरी विधानसभा मतदारसंघात ४१८ मतदान केंद्रांवर ४६.२६ टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीपेक्षा हा टक्का ३.६१ने अधिक आहे.

पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदारसंघात ४१८ मतदान केंद्रांवर ४६.२६ टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीपेक्षा हा टक्का ३.६१ने अधिक आहे. एकूण १ लाख ७६ हजार ६७६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ९७ हजार ३६१ इतकी आहे, तर महिला मतदारांची संख्या ७९ हजार ३११ इतकी आहे. तर इतर दोन मतदारांचा समावेश आहे. तरुणांचा उत्साह अधिक दिसून आला. किरकोळ बाचाबाचीच्या घटना वगळता मतदान शांततेत झाले. मतदार यादीतील नाव शोधून भाग क्रमांक, मतदान केंद्रातील खोली क्रमांक शोधून देण्यासाठी कार्यकर्ते लॅपटॉप घेऊन सज्ज होते. मात्र, सकाळी ९ वाजले तरी मतदार मात्र बाहेर पडले नाहीत. ९ ते ११ या वेळेत १२ टक्के मतदान झाले.३ मतदान केंद्रांवर अवघे २ टक्के मतदान पिंपरी कॅम्पातील इंदिरा गांधी विद्यालयातील ३ मतदान केंद्रांवर दुपारी १ वाजेपर्यंत केवळ २ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. हे सर्वात नीचांकी मतदान आहे. मात्र दुपारनंतर या मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र पहावयास मिळाले. एवढेच नव्हे तर सहा वाजल्यानंतरही मतदान सुरू होते.स्वयंसेवक कसले?पिंपरीत नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या इमारतीतील दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावर असलेल्या मतदान केंद्रांवर अपंग, वृद्ध आणि आजारी अशा मतदारांना नेण्यासाठी डोलीची व्यवस्था केली होती. या डोली उचलण्यासाठी नेमणूक केलेले स्वयंसेवक डोली उचलून नेण्याच्या क्षमतेचे नव्हते. त्यांचीच अवस्था अत्यंत केविलवाणी झाल्याचे दिसून येत होते. पोलीस व्हॅनमध्ये टाकून पुण्यातून काही लोकांना पिंपरीत आणले होते. त्यांच्यातील बहुतांश नशेबाज जाणवत होते. त्यांच्याकडे पाहून अपंग, वृद्ध डोलीत बसण्यास कचरत होते. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर पुण्यात मजूर म्हणून काम करतो, पण साहेबांनी ५०० रुपये मिळतील असे सांगितले म्हणून आलो अशी कबुलीच त्यांनी दिली.