शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
4
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
5
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
6
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
7
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
8
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
9
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
10
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
11
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
12
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
13
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
14
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
15
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
16
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
18
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
19
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
20
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार

मतदार यात्रेतून येणार का मतदानाला?

By admin | Updated: February 12, 2017 04:50 IST

पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबामहाराजांच्या १० दिवसांच्या यात्रेचा तालुक्यातील पश्चिम भागातील निवडणुकीवर परिणाम होणार आहे. विशेष म्हणजे

गराडे : पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबामहाराजांच्या १० दिवसांच्या यात्रेचा तालुक्यातील पश्चिम भागातील निवडणुकीवर परिणाम होणार आहे. विशेष म्हणजे, प्रचारात उमेदवारांना लोक गावात सापडणे मुश्कील असतानाच यात्रेच्या मुख्य व शेवटच्या मारामारीच्या दिवशीच (दि. २१) मतदान आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची दाट शक्यता आहे.दिवे-गराडे जिल्हा परिषद गटाचा निम्मा भाग व गराडे पंचायत समिती गण या यात्रेला जाणाऱ्या गावांमध्ये समाविष्ट होतो. त्यामध्ये गराडे, भिवरी, चांबळी, बोपगाव, सोमुर्डी, दरेवाडी, वारवडी, थापेवाडी, रावडेवाडी, हनुमानवाडी, मठवाडी, पठारवाडी, आस्करवाडी, विठ्ठलवाडी, कोडीत बुद्रुक, कोडीत खुर्द या गावांचा समावेश आहे.विशेषत: कोडीत बुद्रुक, कोडीत खुर्द ही गावे म्हस्कोबामहाराजांच्या मंदिर परिसरातील आहेत. येथील श्रीनाथभक्त मोठ्या संख्येने यात्रेला जातात. प्रामुख्याने २१ फेब्रुवारी या मारामारीच्या दिवशी (लालभडक गुलालाचे शिंपण) या दोन्ही गावांतील ९५ टक्के लोक श्रीक्षेत्र वीरला जातात. त्यामुळे मारामारीच्या दिवशी श्रीक्षेत्र वीर ते श्रीक्षेत्र कोडीत, असा तब्बल ३५ ते ३८ कि.मी.चा प्रवास करून मतदानाचा हक्क कोण-कोण बजावणार, अशी शंका या भागात चर्चेत आहे. मारामारी दुपारी २ ते ३च्या दरम्यान संपते. मारामारी उरकल्यावर किती श्रीनाथभक्त मतदानस्थळी वेगाने पोहोचून मतदान करणार, याची सर्वपक्षीय उमेदवारांना भीतियुक्त चिंता लागली आहे.यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वत्र चौरंगी व पंचरंगी अटीतटीच्या लढती होत आहेत. त्यामुळे उमेदवार १०० ते ५०० मतांच्याच फरकाने निवडून येण्याची शक्यता आहे. त्यातच प्रचारासाठी खूपच कमी अवधी शिल्लक राहिल्याने उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी धावपळ उडत असून, दमछाक होत आहे. त्यातच श्रीक्षेत्र वीर येथील म्हस्कोबामहाराज यात्रेमुळे यात्राकाळात मतदार मतदानाला कसा प्रतिसाद देतात, यावरच उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.श्रीक्षेत्र वीर येथे देवाचा गुलाल अंगावर घेतल्याशिवाय यात्रा संपली, असे मानत नाहीत. ते तेथे उपस्थित राहून भक्तिभाव जोपासतात. वीर-कोडीत अंतर मोठे आहे. मारामारी झाल्यानंतर श्रीनाथभक्त मतदानाचा हक्क स्वत:च्या वाहनांनी वेगाने येऊन किती प्रमाणात बजावतात, पक्षाचे कार्यकर्ते व इतर लोक त्यांना कशी मदत करणार, यावर मतदानाची टक्केवारी अवलंबून आहे.- निवृत्ती जरांडे, उपसरपंच, कोडीत