शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

आज मतदार 'राजा'

By admin | Updated: February 21, 2017 02:16 IST

जिल्हा परिषदेच्या ७५ गट आणि पंचायत समितीच्या १५० गणांच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.२१) सकाळी ७.३० ते सायंकाळी

पुणे: जिल्हा परिषदेच्या ७५ गट आणि पंचायत समितीच्या १५० गणांच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.२१) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत जिल्ह्यात सर्वत्र मतदान होणार आहे. उद्याचा दिवस हा संपूर्ण जिल्ह्यासाठी महत्त्वाचा असणार असून सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदारराजा मतपेटीत बंद करणार आहे. यामध्ये जिल्हा परिषदेसाठी सुमारे ३७५ तर पंचायत समितीसाठी ६४३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यावेळी प्रथमच जिल्ह्यात राष्ट्रवादी काँगे्रस, काँगे्रस, शिवसेनेसह भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणूक लढवत असून, बहुतेक सर्व ठिकाणी ही चौरंगी लढत होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक सर्वच पक्षांसाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी तब्बल २२ हजार २५५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, म्ातदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी तीन वेळा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रत्येक केंद्रासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी स्वतंत्र अशा दोन स्वतंत्र ईव्हीएम मशीन देण्यात आले आहे. जिल्ह्यात ३ हजार ३६९ केंद्रांसाठी १० हजार २०० बॅलेट युनिट व ७ हजार ४८० कंट्रोल युनिटचा वाटप केला जाणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीचे उमेदवार जुन्नर ३९ (७१), आंबेगाव २४(४०), शिरुर २६(४५), खेड २४(४५), मावळ २०(४४), मुळशी १६(३४), हवेली ६३(११७), दौंड ३८(४८), पुरंदर १८(३८), वेल्हा १३(२२), भोर १२(२३), बारामती ३७(५४), इंदापूर ४५(६२)आपत्कालीन परिस्थितीसाठी स्वतंत्र ३४४ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्तीया वेळी प्रथमच जिल्ह्यात कोणत्याही स्वरुपाची आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास, मतदान यंत्र बंद पडले, काही तांत्रिक बिघाड झाल्यास किंवा कोणत्याही स्वरुपाची अडचण निर्माण झाल्यास जिल्ह्यात ३४४ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये या अधिकाऱ्यांकडे प्रत्येकी दोन अधिकचे मतदान यंत्र देण्यात आली असल्याचे निवडणूक समन्वय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी सांगितले.८४ मतदान केंदे्र संवेदनशील जिल्ह्यात ८४ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. या संवेदनशील मतदान केंद्रावर अधिकचा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामध्ये सर्वांधिक ३० हवेली तालुक्यात संवदेनशील मतदान केंदे्र आहेत. खेड १३, दौंज १३, आंबेगाव ११, शिरुर ९, मावळ ७, इंदापूर १ संवेदनशील मतदान केंद्राच समावेश आहे. दरम्यान प्रत्येक तालुक्यात दहा आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात असून, येथे पहिल्यादाच मतदान करणा-या मतदारांना गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्यात येणार आहे.उमेदवाराची कुंडली मतदान केंद्राच्या बाहेर लावणार जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर उमेदवारांची संपत्ती, त्यांच्यावर दाखल असलेले गुन्हे याबाबत संक्षिप्त स्वरूपातील माहिती प्रत्येक मतदान केंद्रांच्या बाहेर दर्शनी भागावर लावण्यात येणार आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय मतदार ४जिल्ह्यात एकूण २७ लाख ९२ हजार ७७३ मदातर असून, यामध्ये १४ लाख १६ हजार ७११ पुरुष तर १३ लाख २ हजार ४४६ महिला मतदार  आहेत. यामध्ये तालुकानिहाय मतदार याप्रमाणे- जुन्नर २ लाख ६३  हजार, आंबेगाव १ लाख ७२ हजार, शिरुर २ लाख ३७ हजार, खेड २ लाख ४४ हजार, मावळ १ लाख ७६ हजार, मुवशी १ लाख २१ हजार, हवेली ४ लाख ५१ हजार, दौंड २ लाख ३५ हजार, बारामती २ लाख ४७ लाख, इंदापूर २ लाख ६६ हजार