लोणावळा : जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिका निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी लोणावळा आणि खंडाळा येथील हॉटेल व रेस्टॉरंट असोसिएशनने पुढाकार घेतला आहे. येत्या २१ ते २८ फेब्रुवारी या काळात लोणावळा व खंडाळा (ता. मावळ) येथील हॉटेलमध्ये वास्तव्यास असणाऱ्यांना २० टक्के आणि रेस्टॉरंटमधील बिलात १५ टक्के सवलत देण्याचा निर्णय हॉटेल व्यावसायिकांनी घेतला आहे, अशी माहिती मावळचे प्रांताधिकारी सुभाष भागडे यांनी दिली. जिल्हा प्रशासनाने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनानुसार विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी लोणावळा आणि खंडाळा (ता. मावळ) येथील हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्या वेळी २१ फेब्रुवारीला जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिकेसाठी मतदान केलेल्यांना मतदानाचा पुरावा दाखविल्यानंतर २१ ते २८ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत बिलामध्ये सवलत देण्याचा निर्णय झाला आहे, अशी माहिती भागडे यांनी दिली.
मतदान करा; हॉटेलबिलात ‘डिस्काऊंट’
By admin | Updated: February 8, 2017 02:51 IST