शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

उच्च न्यायालयाचा प्रशासनाच्या कानात ‘आवाज’

By admin | Updated: December 15, 2015 04:07 IST

दिवाळी आणि दसऱ्याच्या कालावधीमध्ये ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देऊनही पुणे मनपा, महसूल विभाग आणि पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.

पुणे : दिवाळी आणि दसऱ्याच्या कालावधीमध्ये ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देऊनही पुणे मनपा, महसूल विभाग आणि पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. एकही कारवाई अथवा गुन्हा दाखल न झाल्यामुळे उच्च न्यायालयाने या तिन्ही यंत्रणांची चांगलीच कानउघाडणी करून मंगळवारी त्या संदर्भात उच्च न्यायालयात उपस्थित राहून स्पष्टीकरण देण्याचे आदेश बजावले आहेत. त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली आहे.उच्च न्यायालयाने दसरा आणि दिवाळीच्या कालावधीत होणारे ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी तसेच असे ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात राज्यातील पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था आणि महसूल विभाग यांना आदेश बजावले होते. परंतु, या संदर्भात एकही कारवाई झाली नसल्याचे समोर आले आहे. उच्च न्यायालयाने याची गंभीर दखल घेऊन सर्वांना खरमरीत पत्र पाठविले आहे. उच्च न्यायालयाचे आदेशही गांभीर्याने घेतले जात नसल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.विशेष शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ध्वनिप्रदूषणाची कारवाई कशी करावी, त्यासाठी कोणती कलमे लावावीत, त्याची एफआयआर अर्थात प्रथम माहिती अहवाल कसा तयार करावा, यासंबंधी पोलिसांना प्रशिक्षण देण्यात आलेले होते. उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार प्रत्येक विभागाच्या सहायक पोलीस आयुक्तांना प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमण्यात आले होते. या संदर्भात विशेष शाखेने सर्व सहायक आयुक्तांशी पत्रव्यवहारही केला होता. परंतु, पुणे आणि पिंपरीमधील ९ विभागांत एकही कारवाई करण्यात आलेली नाही. महसूल व महापालिकेला गणेशोत्सव, नवरात्र, दसरा-दिवाळी या काळात मंडप, अतिक्रमणांसंदर्भात कारवाई करायचे आदेशही उच्च न्यायालयाने दिले होते. परंतु, या आदेशांना तिन्ही यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखविल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील पोलिसांना पुरेशा प्रमाणात ध्वनिप्रदूषण मोजण्यासाठी डेसीबल मीटरच देण्यात आलेले नसल्याचीही वस्तुस्थिती आहे. जे डेसीबल मीटर पुरवण्यात आले त्यांतील बरेचसे नादुरुस्त आहेत. दुरुस्तीचा खर्च मोठा असल्यामुळे हे नादुरुस्त डेसीबल मीटर तसेच पडून असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे एकूणच ध्वनिप्रदूषणासंदर्भात कारवाई करण्यासाठी पोलिसांमध्ये असलेली उदासीनता स्पष्ट झाली आहे. मंगळवारी सर्व विभागांच्या प्रभारी सहायक आयुक्तांना उच्च न्यायालयामध्ये कारवाईच्या अहवालासह उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.