शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांची भिगवणला भेट

By admin | Updated: July 12, 2016 01:49 IST

जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी भिगवणला सदिच्छा भेट दिली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित क्षीरसागर यांच्यासह कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.

भिगवण : जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी भिगवणला सदिच्छा भेट दिली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित क्षीरसागर यांच्यासह कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक संबंधित कार्यकर्त्यांच्या भेटीला इंदापूर येथे जात असलेले बापट यांनी भिगवणला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांच्यासोबत भाजपा आमदार बाळा भेगड हे होते. या वेळी बापट यांनी आपले जुने साथीदार अजित क्षीरसागर यांची भेट घेतली. तर, त्यांच्यासोबत असणारे आमदार भेगडे यांनी अजित क्षीरसागर यांना भाजपामध्ये येण्याचे आमंत्रण दिले. राष्ट्रवादी पक्षाचे खंदे समर्थक असलेले क्षीरसागर यांनी मात्र या बाबतीत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तरीही, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रबळ दावेदार असलेले क्षीरसागर यांना भाजपात निमंत्रण दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. या वेळी भिगवण परिसरातील अनेक कार्यकर्ते बापट यांना भेटण्यास आले होते. या वेळी मारुती वणवे, तुषार क्षीरसागर, नंदू नरुटे, नाना पवार, माऊली मारकड, गणेश जराड, दिनेश मारणे, दिलीप कुंभार, गणेश जमदाडे, संजय भरणे, प्रसाद क्षीरसागर यांनी बापट यांची भेट घेतली. या वेळी क्षीरसागर यांच्या घरातील सुवासिनींनी बापट यांचे औक्षण केले. निघताना, आपण क्षीरसागर यांच्या घरी भोजनासाठी थांबणार असल्याचे सांगून त्यांनी निरोप घेतला.