शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

दृष्टिहीनांचे ‘देखणे यश’

By admin | Updated: June 18, 2014 00:42 IST

राजू सोळंकी हा कोरेगाव पार्क येथील पुणे मुलांच्या अंध शाळेत शिकत होता़ या शाळेचा १०० टक्के निकाल लागला आहे़ सध्या राजू आपल्या गावी हिंगोलीला आहे़

बंडगार्डन : मुळात दृष्टिहीन, त्यात दररोज येणाऱ्या असंख्य समस्या, वडिलांचा आधार नाही, शेती करणारी आई अशा हलाखीच्या परिस्थितीतूनही मूळचा हिंगोलीचा असणारा राजू भिकाजी सोळंकी याने दहावीत ९० टक्के गुण मिळवून अंध विद्यार्थ्यांमध्ये राज्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला आहे़ राजू सोळंकी हा कोरेगाव पार्क येथील पुणे मुलांच्या अंध शाळेत शिकत होता़ या शाळेचा १०० टक्के निकाल लागला आहे़ सध्या राजू आपल्या गावी हिंगोलीला आहे़ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कोरेगाव पार्क येथील, तर शंकर रामकृष्ण माचवे संकुलातील पुणे मुलांच्या अंध शाळेत शिकणारी आठही मुले दहावीच्या परीक्षेत घवघवीत गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहेत. १९३४ साली सुरू झालेल्या या अंध शाळेचा गेल्या ८० वर्षांची परंपरा राखत यंदाही या शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे.राजूच्या यशाबद्दल प्राचार्य भोसले म्हणाले, की राजूने मिळविलेले यश हे शाळेच्या गेल्या ८० वर्षांतील उच्चांक बिंदू गाठणारा विद्यार्थी असून, अंध विद्यार्थ्यांमध्ये ९० टक्के गुण मिळवून त्याने सिद्ध केलेली त्याची गुणवत्ता आनंददायी आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयातील या अंध विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांचे, तसेच तेथील प्राचार्य जनार्दन तोंडे त्याचप्रमाणे गेनबा सोपानराव मोझे प्रशाला येथील प्राचार्य संजय सोमवंशी या शाळेतील ९ वीच्या मुलांनी या अंध मुलांना परीक्षेचे पेपर लिहिताना रायटर म्हणून केलेली मदत, तसेच समाजातील काही सामाजिक विचारांच्या लोकांनी या अंध विद्यार्थ्यांसाठी शिकविणे, पुस्तक वाचून दाखविणे अशा मार्गाने मदत केली आहे. या अंध मुलांच्या शाळेतील गौरव सुरेश अहिर याला ८४.४० टक्के, दीपक किसन ढोकळे याला ८३ टक्के, प्रशांत कुलदीपक राजेश याला ८२.२० टक्के, सतीश भगवान जाधव याला ८१.६० टक्के, मनोज सागर महादे याला ७९.४० टक्के, तर सुदाम वसंत पांडुळे याला ७४.२० टक्के, असे गुण मिळाले आहेत. ही सर्व मुले त्यांच्या वयाच्या ४ वर्षांपासून या अंध मुलांच्या शाळेत शिक्षण घेत आहेत. या ठिकाणी त्यांची राहण्याची, जेवणाची आणि अभ्यासाची उत्तम सोय असून, ही सर्व मुले येरवड्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात शिक्षण घेत होती. काही तांंत्रिक कारणांमुळे या शाळेतील कृष्णा संतोष ब्रह्मक्षत्रीय याचा निकाल राखीव ठेवला गेला आहे. संस्थेतील या यशाबद्दल अंध मुलाच्या शाळेचे प्राचार्य चंद्रकांत भोसले, प्रशासकीय अधिकारी कृष्णा शेवाळे आणि इतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन आणि कौतुक केले. दर वर्षी या अंध मुलांच्या शाळेत दहा-बारा मुले असतातच, मात्र यंदा ही संख्या फक्त ८ होती. चालू शैक्षणिक वर्षात म्हणजेच २०१४-१५ या वर्षात इयत्ता १० वीमध्ये या शाळेतून १७ मुले दहावीची परीक्षा देणार आहेत.गेनबा सोपानराव मोझे महाविद्यालयाचे प्राचार्य संजय सोमवंशी यांनी यशाबद्दल आनंद व्यक्त करुन सांगितले, की आमच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विधायक उपक्रमाबाबतही नेहमीच मार्गदर्शन केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून शाळेतील नववीच्या इयत्तेत शिकणाऱ्या मुलांनी त्यांचा त्यांचा अभ्यास सांभाळून या मुलांसाठी रायटर म्हणून काम करण्याबरोबरच त्यांना अभ्यासातही मदत केली आणि त्याचा परिणाम म्हणून अंध शाळेतील सर्व मुले चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. याचा आनंद अवर्णनीय आहे. (वार्ताहर)