पुणे : नाभिक समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते विश्वनाथ गायकवाड यांना सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यामध्ये बारा बलुतेदार संघटनेकडून ‘समाजगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम होते. यावेळी समृद्धी जाधव, संघटनेचे अध्यक्ष रामदास सूर्यवंशी यांची उपस्थित होती.गायकवाड यांनी गेली ४० वर्षे सामाजिक कार्यात आपला ठसा उमटविल्याचे डॉ. कदम यांनी सांगितले. दादांनी आपला संसार उभा करताना सामाजिक ऋण फेडण्याच्या भावनेतून समाजातील अनेक संसार उभे केले, असे गौरवोद्गार सूर्यवंशी यांनी काढले. महेंद्र गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. संघटनेचे सचिव राजेंद्र पंडित यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)