लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : चाळीस व्हायोलिनवादकांनी सादर केलेल्या समूहवादनाने रसिकांची मने जिंकली. एकत्रित वादनाचे मनोहारी दर्शन घडविणारे व्हायोलिन हे एकमेव वाद्य असल्याची अनुभूती श्रोत्यांनी अनुभवली. उपाध्ये व्हायोलिनवादन विद्यालयातर्फे स्मितांजली हा व्हायोलिनवादनाचा कार्यक्रम टिळक स्मारक मंदिरात रंगला. कार्यक्रमाची सुरुवात धून रागातील रचनेने व संगीतविश्वाच्या सुवर्णकाळातील सदाबहार गीतांच्या सादरीकरणाने झाली. योगिनी देसाई यांचे ‘लग जा गले,’ राजस उपाध्ये यांचे ‘पिऊ बोले, पिया बोले,’ प्रतीक तिवारी यांनी गायलेली स्वरचित रचना, सुजाता मोकाशी यांनी दिलरुब्यावर सादर केलेले ‘जिंदगी भर नही भुलेंगे,’ माधवी गोखले यांचे ‘तेरे सूर, मेरे गीत,’ अभय आगाशे यांनी सादर केलेले ‘याद ना आए,’ सविता सुपनेकर यांचे ‘ओ सजना बरखा बहार आई’ या गीतांनी सांगीतिक मैफलीत रंग भरले. अंजली सिंगडे राव यांनी सादर केलेले ‘दिल चीज क्या है,’ प्रभंजन पाठक यांनी सादर केलेले ‘तू ही रे,’ तेजस उपाध्ये यांनी ‘एक प्यार का नगमा है’ या सर्व गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
व्हायोलिनवादनाने रसिक मंत्रमुग्ध
By admin | Updated: May 9, 2017 04:11 IST