शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सुशिक्षित घरातही महिलांवर हिंसाचार

By admin | Updated: June 28, 2017 04:17 IST

विद्येचे माहेरघर, आयटी हब आणि आता स्मार्ट सिटी होऊ पाहात असलेल्या या पुरोगामी शहरामध्ये हुंड्यांसाठी होणाऱ्या कौटुंबिक छळाच्या

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : विद्येचे माहेरघर, आयटी हब आणि आता स्मार्ट सिटी होऊ पाहात असलेल्या या पुरोगामी शहरामध्ये हुंड्यांसाठी होणाऱ्या कौटुंबिक छळाच्या आणि हुंडाबळींच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. महागड्या वस्तू, घर, गाड्या घेण्यासाठी आजही विवाहितांचा मोठ्या प्रमाणावर छळ केला जात असल्याचे वास्तव आहे. सुखी संसाराची स्वप्ने रंगवत माहेरचा उंबरठा ओलांडून सासरी प्रवेश करणाऱ्या विवाहितांच्या पदरी दु:खाशिवाय काहीच पडत नसल्याचे चित्र आहे. ही समस्या सुशिक्षितांच्या घरांमध्ये प्रकर्षाने जाणवू लागली आहे.  यासोबतच संशयातून तसेच पतीच्या विवाहबाह्य संबंधांमधूनही अशा घटना वाढल्याचे चित्र आहे. शिक्षण घेतल्यानंतर माणूस विचारांनी प्रगल्भ होतो, पण पैशांपुढे प्रगल्भता कमी पडते, असेच या कौटुंबिक छळांच्या प्रमाणावरून दिसते.शिक्षण आणि सामाजिक चळवळींचे केंद्र असलेल्या पुण्यामध्ये सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या विवाहितांचे प्रमाणही मोठे आहे. सुशिक्षित आणि ‘वेल सेटल्ड’ नागरिकांच्या घरांचे वासे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांनी पोखरलेले आहेत. पोलीस आयुक्तालयामध्ये महिलांच्या समस्यांच्या निवारणासाठी ‘महिला साह्य कक्ष’ आहे. या कक्षाकडे वर्षाकाठी कौटुंबिक कलहाच्या साधारणपणे एक हजाराच्या आसपास तक्रारी येतात. त्यांचे समुपदेशन करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु, ज्या प्रकरणांमध्ये समझोता होत नाही, अशी प्रकरणे पोलीस ठाण्यांकडे पाठवून गुन्हा दाखल केला जातो. हुंड्यासाठी छळ होत असेल, तर पूर्वी दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न होता; परंतु आता शहराच्या प्रत्येक भागामध्ये महिला संस्था, संघटना आणि महिला बचत गट, पोलिसांच्या महिला समित्या, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांची अशा वेळी मदत घेतली जाते. तसेच, इंटरनेटवरही भारतातील प्रत्येक कायद्याचे आणि कलमाची सविस्तर माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे.संशयी वृत्ती, उत्पन्नावरून होणारी भांडणे, व्यसनाधीनता, पतीकडून होणारी मारहाण, माहेराहून पैसे आणण्यासाठी होणारा छळ या पारंपरिक कारणांशिवाय विवाहबाह्य संबंध, रात्री उशिरापर्यंत महिलांनी काम करणे, पत्नीचे नोकरी करणे मान्य नसणे अशा कारणांमुळेही विवाहितांवर सासरच्यांकडून अत्याचार होत आहेत. पहिले लग्न झालेले असतानाही पुरुष ही माहिती लपवून ठेवून दुसरे लग्न करतात. त्यानंतर महिलांना त्रास सुरू होतो. यातूनही महिलांचा खून, आत्महत्या अशा घटना घडतात.