शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

कुंभारवळणच्या ग्रामस्थांनी कचरागाड्या पुन्हा अडविल्या

By admin | Updated: February 6, 2016 01:42 IST

शासनाने सासवड नगरपरिषदेला घनकचरा प्रकल्पासाठी कुंभारवळण गावच्या हद्दीत दिलेल्या जागेत पालिकेने प्रकल्प उभारला आहे.

सासवड : शासनाने सासवड नगरपरिषदेला घनकचरा प्रकल्पासाठी कुंभारवळण गावच्या हद्दीत दिलेल्या जागेत पालिकेने प्रकल्प उभारला आहे. मात्र स्थानिक नागरिकांचा या प्रकल्पास तीव्र विरोध आहे. नगरपरिषद प्रशासनाने आज (दि. ५) पुन्हा कुंभारवळणच्या प्रकल्पाकडे घनकचऱ्याच्या गाड्या पाठविल्या असता तेथील स्थानिक नागरिकांनी या गाड्या अडवून सासवडला परत पाठविल्या असल्याची माहिती मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी दिली. हरित न्यायालयाने कुंभारवळण येथेच कचरा प्रकल्प सुरू करावा. याबाबतचे आदेश सासवड नगरपरिषदेला दिले आहेत. त्यानुसार पालिका प्रशासनाने कुंभारवळण येथील घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी कुंभारवळण व परिसरातील ग्रामस्थांची बैठक काही महिन्यांपूर्वी बोलावली होती. पालिका प्रशासनाने हा कचरा डेपो नसून घनकचरा प्रकल्प असल्याचे सांगितले होते. मात्र, स्थानिक नागरिकांच्या तीव्र विरोधामुळे बैठकीत काही निष्पन्न झाले नाही. त्यानंतर सासवड येथील तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी नायब तहसीलदार, नगरपरिषदेचे पदाधिकारी व अधिकारी यांची कुंभारवळण व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी बैठक झाली होती. यामध्ये प्रांत अधिकारी समीर शिंगटे यांनीदेखील हा कचरा डेपो नसून घनकचरा प्रकल्प असल्याचे सांगत एक वेळ याचे प्रात्यक्षिक करावे व त्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे, अशी मागणी केली होती. परंतु, त्या वेळीही सदरच्या ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला होता. तसेच राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत पुन्हा बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर मात्र पुन्हा याबाबत बैठक झाली नव्हती. दरम्यान, आज पुन्हा सासवड नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या दोन कचरागाड्या कुंभारवळण येथील प्रकल्पाकडे आज जात असताना येथील सरपंच अमोल कामथे यांनी ग्रामस्थांसह गाड्या अडविल्या व चाकांतील हवा सोडून दिली. याप्रसंगी पं. स. सदस्य दत्ता झुरंगे, गणेश मोरे, बाबूराव कामथे, आत्माराम कामथे, मारुती भोसले यांसह गावांचे प्रमुख उपस्थित होते. (वार्ताहर)