शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांनी रस्ता खोदून केला बंद

By admin | Updated: November 24, 2015 00:52 IST

चार महिन्यापासून उर्से ग्रामपंचायतीजवळच पडलेल्या खडीमुळे येथील १० ते १२ जण जखमी झाल्याने आणि वारंवार

उर्से : चार महिन्यापासून उर्से ग्रामपंचायतीजवळच पडलेल्या खडीमुळे येथील १० ते १२ जण जखमी झाल्याने आणि वारंवार तक्रार करूनही खडी उचलली जात नसल्याने रस्ताच खोदून बंद करण्याची धमकी ग्रामस्थांनी महिन्यापूर्वी दिली होती. तरीही दुर्लक्ष केल्यामुळे अखेर सोमवारी सकाळी ग्रामस्थांनी रस्ता जेसीबीच्या साह्याने उकरून बंद केल्याने येथील कंपन्या व ग्रामस्थांची चांगलीच गैरसोय झाली आहे.याबाबत ‘लोकमत’ने छायाचित्रासह बातमी प्रसिद्ध केली होती. चार-पाच महिन्यांपूर्वी महिंद्रा हिनोदय व जयहिंद कंपनीसमोरील रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र, कामानंतर येथील मुख्य रस्त्यावर पडलेली दगडी खडी ये-जा करणारे वाहनचालक, दुकानदार, रहिवासी व लहान मुले यांच्यासाठी धोकादायक ठरत होती. कंपनीत कामगारांना नेणारी मोठी गाडी, ट्रक, अती अवजड वाहने या खडीवरून जाताना चाकात अडकून दगड गोफणीतून सुटल्यासारखे उडत होते. त्यामुळे आतापर्यंत दहा ते बारा जणांना मोठी इजा झाली. दुकानांच्या काउंटरच्या काचाही फुटल्या. या ठिकाणी लहान मुलेही खेळत असतात. त्यांनाही दगड लागण्याचा धोका आहे. अपघाती घटना घडत असतानाही ग्रामपंचायत लक्ष देत नसल्याचा आरोप होत होता. पडलेली खडी कंपनीने, ग्रामपंचायतीने का रस्ते विकास महामंडळाने उचलायची या वादात ग्रामस्थांना जीव मुठीत धरून जावे लागत होते. गावातील वायरमन राजू गायकवाड यांना येथील दगड उडून लागल्याने मोठी जखम डोळ्याला झाली. रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील खडी तानाजी कारके यांच्या घरात पाण्यासह वाहून गेल्याने घरात नुकसान झाले. रस्ताच बंद करण्यात आल्याने कंपन्यांची वाहतूक विस्कळीत झाली. (वार्ताहर)