शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांसाठी ग्रामस्थांची चूल पेटली नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 01:56 IST

नीरा वागज परिसरातील ग्रामस्थ शिक्षकांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत.

बारामती : तालुक्यातील नीरा वागज परिसरातील ग्रामस्थ शिक्षकांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. सलग पाचव्या दिवशी डोंबाळे मदनेवस्ती जिल्हा परिषद शाळा बंद राहिली. मंगळवारी (दि.१९) नीरा वागजच्या डोंबाळे मदनेवस्ती परिसरातील घरांमध्ये चूल पेटलीच नाही. उद्या ग्रामस्थ थाळीनाद आंदोलन करणार आहेत. बदली रद्द न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. पहिल्याच दिवसापासून ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे. पहिल्याच दिवशी शाळेला टाळे ठोकण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षांनीही या मागणीला पाठिंबा व्यक्त केला आहे.मंगळवारी गावात चूल पेटलीच नाही. सर्वांनी उपवास धरत निषेध केला. बुधवारी (दि. २०) ग्रामस्थ थाळीनाद आंदोलन करणार आहेत.मंगळवारी दुपारी जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी तावरे, पंचायत समिती सदस्य अबोली भोसले, नीरा वागजच्या सरपंच मीनाक्षी देवकाते, सदस्य स्वाती देवकाते यांनी येथील ग्रामस्थांची भेट घेतली. शिक्षकांच्या बदल्यांबाबत चर्चा केली. या वेळी ग्रामस्थांनी बदली रद्द न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा या वेळी दिला.तसेच, सर्व विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले काढून खासगी शाळेत प्रवेशाची तयारी ठेवल्याचे ग्रामस्थांनी या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले.या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काकासोा डोंबाळे, विठ्ठलराव देवकाते, सुधीर देवकाते, पोपटराव देवकाते, सुनील गावडे, सुरेश कोकरे, संग्राम मदने, बाळासाहेब देवकाते, अप्पासाहेब देवकाते आदी पालकांनी या वेळी चर्चेत सहभाग घेतला.गावात संतोष गावडे, आबासाहेब कदम या दोघा शिक्षकांनी केलेला शैक्षणिक कायापालट ग्रामस्थांना भावला आहे. शाळेच्या पहिल्या दिवसापासून ग्रामस्थांनी गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलनाचे सत्र सुरू ठेवले आहे. दरम्यान, येथे बदली झालेले सुवर्णा आडके, श्रीपाद देशपांडे यांच्यासह इनामदार (पूर्ण नाव माहीत नाही) हे शिक्षक त्यांना रुजू होऊ न दिल्याने दिवसभर झाडाखाली बसून होते.>विद्यार्थ्यांचे नुकसान नकोजिल्हा परिषद सदस्या मिनाक्षी तावरे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले की, शिक्षक बदल्यांच्या घोळामुळे, धोरणामुळे राज्यात अनेक शाळा बंद आहेत. या शाळांमध्ये सर्वसामान्यांची मुले शिक्षण घेतात. त्याचे नुकसान होत आहे. राज्य शासनाने सर्व अधिकार स्वत:क डे ठेवले आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषदेला अधिकार ठेवले नाहीत. बुधवारी (दि २०)होणाºया जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत यावर अवाज उठविणार असल्याचे तावरे म्हणाल्या.