शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाविरोधात गावकऱ्यांचा मोर्चा

By admin | Updated: May 10, 2017 04:10 IST

विमानतळविरोधी संघर्ष कृती समितीच्या वतीने राज्य सरकारच्याविरोधात प्रस्तावित विमानतळ प्रकल्प रद्द व्हावा, यासाठी तहसील कार्यालयावर विमानतळ विरोधी घोषणा देत मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कसासवड : विमानतळविरोधी संघर्ष कृती समितीच्या वतीने राज्य सरकारच्याविरोधात प्रस्तावित विमानतळ प्रकल्प रद्द व्हावा, यासाठी तहसील कार्यालयावर विमानतळ विरोधी घोषणा देत मोर्चा काढण्यात आला. पुरंदरमध्ये विमानतळास विरोध दर्शविण्यासाठी वनपुरी, उदाचीवाडी, एखतपूर - मुंजवडी, खानवडी, पारगाव येथील शेतकऱ्यांनी नुकत्याच ग्रामसभा घेतल्या. यामध्ये शासनाचा जोरदार निषेध करण्यात आला. त्यानंतर निवेदन जिल्हाधिकारी सौरभ राव याना देण्यात आले. त्या वेळी त्यांनी शेतकऱ्यांशी बोलताना शासनाची भूमिका स्पष्ट केली. त्याचवेळी शेतकऱ्यांचा विरोध पत्करून विमानतळ करणार नाही, अशी ग्वाही दिली होती.परंतु सध्या शासनाचे निर्णय पाहता विमानतळ होण्याच्या हालचाली दिसू लागल्याने गावकरी पुन्हा हवालदिल झाले आहेत. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विश्वास पाटील विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या उपस्थितीत बैठक होऊन त्यामध्ये पॅकेज जाहीर होण्याबरोबरच सात उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकाऱ्यांची भूसंपादनासाठी नेमणूक करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात आला होता. काहीही झाले तरी विमानतळच होऊन द्यायचा नाही, असा ठाम निर्धार या मोर्चातील महिलांनी व ग्रामस्थांनी केला होता. या वेळी अनेक प्रकल्पबाधितांनी राज्य शासनाच्याविरोधात तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. निवेदन स्वीकारण्यासाठी तहसीलदार सचिन गिरी शासनाच्या वतीने हजर होते. अतिरिक्त पोलीस आयुक्त तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली भोरचे उपविभागीय अधिकारी अशोक भरते, सासवडचे पी. आय. क्रांतिसिंह पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. या मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या वेळी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय झुरंगे, पंचायत समिती सदस्या सुनीता कोलते, लक्ष्मण बोरावके, संतोष हगवणे, अनिकेत कामठे, अमोल कामठे आदी शेतकरी उपस्थित होते.