शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

जिल्ह्यात आता ग्रामअभ्यासिका

By admin | Updated: January 10, 2017 02:50 IST

जिल्हा परिषदेने आपल्या शेवटच्या कार्यकाळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

पुणे : जिल्हा परिषदेने आपल्या शेवटच्या कार्यकाळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रत्येक तालुक्यात एक अत्याधुनिक अशी ग्रामअभ्यासिका करण्यात येणार आहे. याला मंजुरी मिळाली असून यात प्राधान्याने स्पर्धा परीक्षच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. खेडोपाड्यातील मुलं शिकली, मोठी झाली तर हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली असू शकते, म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून समाजमंदिरात प्रत्येक जिल्हा परिषद गटात एक अभ्यासिका करण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली होती. मात्र, यात महत्त्वपूर्ण बदल करून आता प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे १३ ग्राम अभ्यासिका इमारतीसह अत्याधुनिक स्वरूपात करण्याचे ठरविले आहे. तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायती व शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाची केंद्र असलली गावे यासाठी निवडण्यात आली आहेत. एका अभ्यासिकेसाठी ३३ लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असून यात सुसज्ज इमारत, ग्रंथालय, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी चांगली बैैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. १०० विद्यार्थ्यांची एका वेळेस व्यवस्था करण्यात येणार आहे. अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेला उपयुक्त असलेली सर्व पुस्तके ठेवण्यात येणार आहेत. तसेच इतर साहित्याची पुस्तकेही ठेवण्यात येणार आहे. इथे होणार अभ्यासिकाखेड - शेलपिंपळगावमावळ - टाकवे. बु.इंदापूर - अंथुर्णेबारामती - सुपापुरंदर - वाल्हेदौैंड - खुटबावशिरूर - न्हावराभोर - केंजळवेल्हा - वेल्हा मुळशी - पौैड पं. स. इमारतजुन्नर - नारायणगावआंबेगाव - निरगुडसरहवेली - लोणीकंद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून समाजमंदिरात प्रत्येक जिल्हा परिषद गटात एक अभ्यासिका करण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली होती.५ गुंठे जागेत ही इमारत उभी राहणार असून, त्याची देखभालदुरुस्तीची जबाबदारी ही ग्रामपंचायतीवर असणार आहे. अशा स्वरूपाच्या गावात त्याही जिल्हा परिषदेमार्फत ग्रामअभ्यासिका असलेली पुणे ही राज्यात एकमेव जिल्हा परिषद असेल, असा दावाही प्रदीप कंद यांनी केला. थोर पुरुषांचे स्मरण फक्त जयंतीनिमित्तच न करता त्यांच्या विचारांची व कार्याची प्रेरणा कायम स्मरणात राहावी, सातत्याने त्यांचे विचार समाजात रुजावेत, यासाठी या अभ्यासिका काम करीत आहोत.- प्रदीप कंद, अध्यक्ष, जिल्हा परिषद