शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विलास लांडे यांचे माघारीनाट्य

By admin | Updated: November 6, 2016 04:33 IST

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोन आल्यानंतर अखेरच्या क्षणी माजी आमदार विलास लांडे यांनी आपली उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला. परंतु जिल्हाधिकारी

पुणे : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोन आल्यानंतर अखेरच्या क्षणी माजी आमदार विलास लांडे यांनी आपली उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन देखील लांडे यांनी अर्ज मागे घेण्यासाठी प्रतिनिधी पाठविला व स्वत: साडेतीन वाजत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आले. प्रतिनिधीला अधिकृत पत्र न दिल्याने व लांडे वेळेत उपस्थित न झाल्याने त्यांचा माघारीचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही. लांडे यांनी ठेवलेला अर्ज तांत्रिक कारणामुळे की राजकीय खेळीमुळे याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत माघारीसाठी अखेरचा अर्धा तास राहिला तरी लांडे अर्ज मागे घेण्यासाठी आले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीसमोर बंडखोरीचे संकट कायम अशी चर्चा सुरू झाली. लांडे यांनी माझा प्रतिनिधी वेळेपूर्वी अर्ज घेऊन आला त्यामुळे माघार घेतली असल्याचे जाहीर करण्याची मागणी केली. विलास लांडे यांच्या माघारी अर्जाबाबत पेच निर्माण झाल्याचे कळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अनिल भोसले यांनी धावतच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय गाठले. भोसले यांनीदेखील अर्ज घेण्यासाठी प्रचंड आग्रह केला. पक्षाचे नेते अजित पवार यांचा फोन देखील मुठे यांना लावून दिला. परंतु वेळ संपला असल्याचे सांगत मुठे यांनी लांडे यांचा अर्ज स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला.पावणेतीन वाजता लांडे यांचा प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाला व उमेदवारी मागे घेण्याचा अर्ज भरून दिला. परंतु या प्रतिनिधीकडे लांडे यांनी अधिकृत प्रतिनिधी केल्याचे प्राधिकार पत्र दिले नाही. त्यामुळे त्यांचा अर्ज सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र मुठे यांनी स्वीकारला नाही. अर्ज स्वीकारण्याची मुदत संपल्यानंतर मुठे यांनी निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व माध्यम प्रतिनिधींना उमेदवारी अर्ज मागे घेतले. उमेदवार व रिंगणातील उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यानंतर विलास लांडे कार्यालयात आले. तोपर्यंत साडेतीन वाजून गेले होते.