शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

विजयस्तंभ परिसर केला चकाचक

By admin | Updated: January 2, 2015 23:20 IST

सकाळी ८.३० ची वेळ. हवेत गारठा. अशा वेळी हातात झाडू, बकेट घेऊन महिला, मुले व ७० ते ८० कार्यकर्त्यांनी प्रचंड उत्साहात साफसफाईला सुरुवात केली

लोणीकंद : सकाळी ८.३० ची वेळ. हवेत गारठा. अशा वेळी हातात झाडू, बकेट घेऊन महिला, मुले व ७० ते ८० कार्यकर्त्यांनी प्रचंड उत्साहात साफसफाईला सुरुवात केली आणि दोन तासांत कोरेगाव भीमा विजयस्तंभ परिसर चकाचक करून टाकला. १ जानेवारी २०१५ या दिवशी कोरेगाव भीमा विजयस्तंभ येथे मानवंदना देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुयायी व शाहू-फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते येतात. पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, खाद्यपदार्थांचे कागद, ऊस, हरभरा असा कचरा साठलेला दिसतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसा. फाउंडेशन ग्रुपचे अध्यक्ष राजेश दुलीया, सचिव मिलिंद जाधव, संघटक रमेश जाधव व त्यांचे ८० कार्यकर्त्यांनी या परिसराचे चार भाग करून स्वच्छता केली. चार ट्रक कचरा गोळा करण्यात आला. सकाळी ११ पर्यंत संपूर्ण परिसर चकाचक झाला होता. जनसेवा सहकारी बँक कर्मचारी, युनिटी सोशल फाउंडेशन, भीमशक्ती सामाजिक संघटना पिंपरी, पंचशील संघ तुकारामनगर, हडपसर सोशल ग्रुप, एच. ए. युनियन, ओबीसी संघटना आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. कोरेगाव भीमा विजयस्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, विशाल सोनवणे, सत्यन गायकवाड, राजेश सोनकांबळे, भाऊसाहेब वनवे, दीपक गायकवाड आदींनीही मदत केली. (वार्ताहर)४गुरूवारी (दि. १ जानेवारी) कोरेगाव भिमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून लाखो कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे परिसरात पाण्याच्या बाटल्या, खाद्य पदार्थांचे पाकीटे असा केरकचरा मोठ्या प्रमाणातसाठला होता. या परिसरात मोठी जत्राच भरल्याचे दृष्य दिसत होते. हजारो कार्यकर्ते त्यांच्या मुलांबाळासह आले होते. शुक्रवारी हा सर्व परिसर कार्यकर्त्यांनी एकत्र येवून स्वच्छ केला.विजयस्तंभ परिसर हे प्रेरणास्थळ झाले पाहिजे. अशी भूमिका काल सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी जाहीर मांडली होती. त्याला अनुसरून ही स्वच्छता मोहिम राबवण्यात आली.