शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला सजग पुणेकराने शिकवला चांगलाच धडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे विनामास्क फिरणारे पोलिसांच्या रडारवर आहेत. प्रत्येकी ५००रुपये दंड ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे विनामास्क फिरणारे पोलिसांच्या रडारवर आहेत. प्रत्येकी ५००रुपये दंड वसूल करण्यात येत आहे. आतापर्यंत विनामास्क कारवाईसाठी पुणेकरांनी तब्बल १३ कोटींच्यावर दंड भरला आहे. मात्र, एका सजग पुणेकराने सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या वाहतूक महिला पोलीस कर्मचाऱ्यालाच चांगलीच अद्दल घडवली आहे. नुकतेच महापालिकेने त्या महिला कर्मचाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.

पुणे वाहतूक शाखेच्या वंदना संजय आल्हाट या महिला पोलीस कर्मचाऱ्याने विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करताना स्मितेश रासम यांच्यावर कारवाई केली होती. मात्र, गंमत म्हणजे त्यांच्याकडून दंडाची रक्कम वसूल करताना संबंधित वाहतूक महिला पोलीस कर्मचाऱ्याने देखील मास्क परिधान केला नव्हता. या प्रसंगाचा व्हिडीओ रासम यांनी काढला. तसेच तो त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन १७ फेब्रुवारी २०२१ रोजी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पुणे पोलीस, पुणे महापालिका यांना टॅग करत प्रसिद्धदेखील केला होता.

https://twitter.com/smiteshrasam/status/1362078960243236874?s=1002

या ट्विटची दखल घेत पुणे महापालिकेने सोमवारी वंदना आल्हाट या महिला पोलीस कर्मचाऱ्यावर ठिकाणी मास्क न वापरल्याच्या कलमाखाली ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. यामुळे विनामास्क कारवाईच्या नावाखाली नेहमीच पुणेकरांच्या खिशात हात घालणाऱ्या वाहतूक शाखेच्या महिला पोलीस कर्मचाऱ्यालाच पुणेकराने दणका दिला आहे.