शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : रिक्षा माझी भारी, तिचीच केली फेरारी 

By admin | Updated: November 18, 2016 17:15 IST

ऑनलाइन लोकमत पुणे, दि. 18 -    मर्सिडिझ, ऑडी, फेरारी अशा मोठमोठ्या गाड्याही जिच्या समोर फिक्या पडतील अशी देखणी ...

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 18 -    मर्सिडिझ, ऑडी, फेरारी अशा मोठमोठ्या गाड्याही जिच्या समोर फिक्या पडतील अशी देखणी रिक्षा पुण्यातील कोथरुड परिसरातील किसनराव मारणे यांनी तयार केली आहे. लाल रंगाची व्हिंटेज लूक असलेली मारणे काकांची रिक्षा सध्या पुणेकरांचे लक्ष वेधून घेत आहे.
 
गेल्या अनेक वर्षापासून मारणे रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करीत होते.  त्यानंतर स्कूल बसचा व्यवसाय सुरु केला. आयुष्यात स्थैर्य आले. मात्र जिच्या सोबत त्यांनी त्यांच्या आयुष्याचा मोठा काळ व्यथित केला,  जिच्यामुळे व्यवसाय वृद्धींगत झाला, अशी जिवाची रिक्षा कायम सोबत असावी अशी त्यांची इच्छा होती. 
 
त्यामुळे मोटार घेण्याची ऐपत असूनही त्यांनी आपली ही रिक्षाच वेगळ्या प्रकारे तयार करुन घ्यायचे ठरवले. त्यांच्या या कल्पनेला सत्यात उतरवण्याचं काम कात्रज येथील सेंट्रल ऑटोचे कारागीर सईदभाई दलाल यांनी केले. गेल्या दोन ते तीन वर्षापासून ते या रिक्षावर काम करतायेत. एखाद्या व्हिंटेज लूक असलेल्य फेरारी सारखी ती दिसत आहे. अजूनही काम सुरू असून छत उघडण्यासारखा दरवाजापासून अनेक सुविधा करण्याचे काम सुरू आहे. 
 
‘लोकमत’शी बोलताना मारणे  म्हणाले, ‘‘गेली अनेक वर्षे  दिवसातील वीस तास मी रिक्षा चालवायचो. माझे संपूर्ण आयुष्यच रिक्षात गेलं. रिक्षाचा व्यवसाय बंद करताना रिक्षा आपल्या कायम सोबत असावी म्हणून खाजगी वापरासाठी मी रिक्षा सजवण्याचे ठरवले. माझी ही रिक्षा कुठल्याही कारपेक्षा माझ्यासाठी कमी नाही.
 
२०१२ साली  झालेल्या राज्यस्तरीय 'रिक्षा फॅशन शो'मध्ये त्यांनी सजवलेल्या रिक्षाला प्रथम क्रमांक मिळवला होता. पहिल्यापासूनच आपल्या रिक्षावर जीवापाड प्रेम करणारे मारणे आपल्या नातवंडांना या रिक्षातून सैर घडवतात. ते जेथे जातात तेथे लोक या रिक्षासोबत फोटो काढतात.
 

https://www.dailymotion.com/video/x844ikd