शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

VIDEO : जिवाशी खेळ! भर रस्त्यात रुग्णवाहिका उभी करून चालकाचे गुत्त्यावर फुल्ल मद्यप्राशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 19:57 IST

... अन् मद्यप्राशन करणाऱ्या रुग्णवाहिकाचालकाने ठोकली धूम;बोपोडी येथील प्रकार

पिंपरी : रुग्णवाहिकेच्या चालकाला देवदूत तर रुग्णवाहिका म्हणजे जीवनवाहिनी होय. मात्र यातील काही चालक मद्यपान करून अपघातांना निमंत्रण देत आहेत. एका सजग नागरिकाने मोबाईल फोनमध्ये चित्रीकरण करून असाच एक प्रकार उघडकीस आणला आहे. रुग्णवाहिकेच्या चालकाला मद्यप्राशन करताना रंगेहाथ पकडले. त्यामुळे त्याला धूम ठोकावी लागली.  पुणे येथील बोपोडी येथे बुधवारी (दि. २०) दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार घडला. रिषभ सेठिया यांनी मोबाईलमध्ये चित्रिकरण केले. पुणे-मुंबई महामार्गावर बोपोडी येथे दारु विक्रीचे दुकान आहे. या दुकानाच्या परिसरात महामर्गावर एक रुग्णवाहिका बराच वेळ उभी असल्याची माहिती सेठिया यांना मिळाली. त्यांनी पाहणी केली असता रुग्णवाहिकेचा चालक तेथे दिसून आला नाही. त्यामुळे त्यांनी चालकाचा शोध घेतला. त्यांनी दारु विक्रीच्या दुकानात जाऊन पाहणी केली. तेथे काही जण मद्यप्राशन करीत होते. बाहेर अ‍ॅम्बुलन्स कोणी उभी केली आहे, असे सेठिया यांनी विचारले. माझी आहे अ‍ॅम्बुलन्स, मी उभी केली आहे, असे एक तरुण म्हणाला. ती जागा आहे का अ‍ॅम्बुलन्स उभी करण्याची, असे सेठिया म्हणाले. त्यानंतर दारुची बाटली तसेच ग्लास घेऊन तो तरुण बाहेर गेला. त्याने अ‍ॅम्बुलन्स घेऊन पळ काढला. 

महामार्गावर सिग्नलजवळील प्रकारमहामार्गावर सिग्नलजवळ हा प्रकार घडला. येथे सिग्नल असल्याने मोठी वर्दळ असते. तसेच वाहने भरधाव जातात. त्यामुळे येथे अपघाताचा धोका आहे. भर रस्त्यात वाहने उभी केली जातात. अशा वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

रुग्णवाहिकेचा चालक निर्व्यसनी असावा. रुग्णाला जीवदान देण्यासाठी त्याला वर्दळीतून वाट काढून रुग्णालयापर्यंत रुग्णवाहिका घेऊन जायची असते. मात्र काही चालकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे रुग्णवाहिकांना अपघात होऊन रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दुखापत होऊन जीव गमावण्याची वेळ येऊ शकते.- रिषभ सेठिया, बोपोडी 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDrunk And Driveड्रंक अँड ड्राइव्हhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या