शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

व्हिक्टोरिया तलाव गाळात

By admin | Updated: April 22, 2016 01:11 IST

दौंड व बारामती तालुक्यांतील काही गावांची तहान भागविण्याचे काम वरवंड येथील व्हिक्टोरिया तलाव करीत असून, या तलावाच्या निर्मितीपासून आजतागायत या तलावातील गाळ काढण्यात आलेला नाही.

वरवंड : दौंड व बारामती तालुक्यांतील काही गावांची तहान भागविण्याचे काम वरवंड येथील व्हिक्टोरिया तलाव करीत असून, या तलावाच्या निर्मितीपासून आजतागायत या तलावातील गाळ काढण्यात आलेला नाही. तलावामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला असल्यामुळे, या तलावाची पाणी साठवण क्षमता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. गावातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या तलावासाठी गेल्या आहेत, त्या शेतकऱ्यांच्या विहिरी सध्या कोरड्या पडल्या आहेत. तलाव जरी जवळ असला, तरी या मोठ्या प्रमाणात साचलेल्या गाळामुळे पाणी पाझर होत नाही. यामुळे या तलावाचा वरवंडकरांना साधा पाझराचा पण फायदा नाही. वरवंडला तर या तलावातील पाणी मिळत नाही. व्हिक्टोरिया तलाव हा १८७६ साली करण्यात आला आहे. हा तलाव जवळपास ३१० एकरा मध्ये असून, या तलावाची साठवण क्षमता २०० दशलक्ष घनफुट आहे. तसेच पाटबंधारे(जलसंपदा) विभाग हा या तलावातून कुरकुंभ एमआयडीसी, जानाई-शिरसाई योजना, वायनरी प्रकल्प यांना पाणी देण्यात येते. हा तलाव खडकवासला फाट्याद्वारे भरला जातो व हा तलाव भरल्या नंतर पुढे गरजेनुसार पाणी पुरवले जाते.