शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईने घेतला बळी

By admin | Updated: March 31, 2016 03:04 IST

गावाकडे पडलेल्या दुष्काळामुळे पोट ‘जगवण्या’साठी पुण्यामध्ये आलेल्या कुटुंबाची पाण्याची वणवण काही थांबली नाही. पुण्यासारख्या शहरातही पाठी लागलेल्या पाणीटंचाईने शेवटी

पुणे : गावाकडे पडलेल्या दुष्काळामुळे पोट ‘जगवण्या’साठी पुण्यामध्ये आलेल्या कुटुंबाची पाण्याची वणवण काही थांबली नाही. पुण्यासारख्या शहरातही पाठी लागलेल्या पाणीटंचाईने शेवटी त्यांच्या घरातल्या अवघ्या बारा वर्षांच्या मुलीचा बळी घेतला. पिण्यासाठी पाणी आणायला जात असताना, अज्ञात वाहनाने या मुलीला धडक दिली. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला.किरण बाळासाहेब मांडे (वय १२, रा. तापकीरचाळ, बाणेर गावठाण) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. चतु:शृंगी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार रवींद्र देवरुखकर यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांडे कुटुंब मूळचे परभणी जिल्ह्यामधले आहे. मागील तीन वर्षांपासून मराठवाड्यामध्ये दुष्काळ आहे. कामधंद्यासाठी दोन वर्षांपूर्वी पुण्यात आलेल्या बाळासाहेब मांडेंचे कुटुंब मोलमजुरी करून जगत होते. बाणेर गावठाणातील तापकीर चाळीमध्ये एका खोलीत हे कुटुंब राहाते. गावाकडे पाणी नसल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागलेल्या या कुटुंबाला पुण्यातही पाणीटंचाईच्या झळा बसत होत्या. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास किरण पाणी आणण्याकरिता सायकलवरून जात होती. त्या वेळी भरधाव आलेल्या मोटारीने तिला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या किरणला नागरिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. अपघात केलेला मोटारचालक गाडीसह पसार झाला. (प्रतिनिधी)उपनिरीक्षकाला सौजन्याचे वावडेया अपघाताची माहिती घेण्यासाठी चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एस. बी. बाबर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी यापुढे कोणत्याही गुन्ह्याची माहिती घेण्यासाठी मला फोन करायचा नाही. माहिती प्रेसरूमला पाठवतो, त्यामुळे माहिती त्याठिकाणावरूनच घ्यावी अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना प्रथम संपर्क साधला असता, आपण अद्याप घटनेची कागदपत्रेच पाहिली नसल्याचे उत्तर दिले. एवढ्याशा गुन्ह्याच्या माहितीसाठी आमच्या वरिष्ठांना कशाला फोन करता, असा प्रश्नही त्यांनी केला. एवढा गंभीर गुन्हा घडूनही त्याबाबत असलेली तपास अधिकाऱ्यामधली उदासीनता यानिमित्ताने समोर आली. मृत्युमुखी पडलेल्या मुलीच्या कुटुंबाची माहिती देण्यास चतु:शृंगी पोलिसांनी शेवटपर्यंत टाळाटाळ का केली, हे न उलगडलेले कोडे आहे.