शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

वाळूमाफियाकडून ग्रामस्थाचा बळी

By admin | Updated: April 17, 2015 23:22 IST

येथील तरुण नीलेश भोंगळे (वय २२) या तरुणाने विष पिऊन आत्महत्या केली असल्याची घटना उंडवडी (ता. दौंड) येथे घडली

राहू : वाळूवाहतुकीसाठी दिलेल्या रस्त्याचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या तरुणाला वाळूमाफियांनी बेदम मारहाण केल्याने येथील तरुण नीलेश भोंगळे (वय २२) या तरुणाने विष पिऊन आत्महत्या केली असल्याची घटना उंडवडी (ता. दौंड) येथे घडली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. नीलेश याला बुधवारी मारहाण करण्यात आली, तर त्याने गुरुवारी आत्महत्या केली आहे. याबाबत खरी तक्रार घेण्यास यवत पोलिसांकडून राजकीय दबावापोटी टाळाटाळ करण्यात येत असल्याचे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले. या संदर्भात यवत पोलिसांनी सदर युवकाने विष घेऊन आत्महत्या केली असल्याची नोंद केली आहे. काही दिवसांपूर्वी राहूबेट परिसरातील अनेक वाळू भूखंडांचे लिलाव करण्यात आले आहेत. पैकी उंडवडी (ता. दौंड) येथील वाळूचा लिलाव एका बड्या ठेकेदाराने घेतला असून, वाळूची वाहतूक करण्यासाठी नदीशेजारील शेतकरी संपत भोंगळे यांच्या शेतजमिनीतून रस्ता भाडेतत्त्वावर दोन लाख रुपये किमतीला घेण्यात आला. पैकी काही रक्कम संबंधित शेतकऱ्याला दिली. काही रकमेचा धनादेशही दिला होता; मात्र हा धनादेश बँकेत घेऊन गेल्यावर त्या खात्यात रक्कम शिल्लक नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संपत भोंगळे यांचा मुलगा नीलेश संपत भोंगळे (वय २२) याने आपल्या शेतामध्ये जाऊन व्यवहाराप्रमाणे पैसे द्यायचे नसतील, तर तुमचा रस्ता बंद करू किवा आमची उर्वरित रक्कम द्या, असे सांगितले. यावरून नीलेश व ठेकेदार यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. त्यानंतर ठेकेदार व त्याच्यासोबतच्या लोकांनी नीलेश याला शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. आपल्या शेतातून रस्ता घेऊन हे लोक आपल्यालाच मारहाण करतात, याचा राग मनात धरून नीलेशने शेती उपयोगी कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे उंडवडी परिसरावर शोककळा पसरली आहे.याबाबतची तक्रार यवत पोलीस ठाण्यात नोंदविण्यास पोलिसांकडून राजकीय दबावापोटी टाळाटाळ करण्यात येत असल्याचे नीलेश यांच्या घरच्यांकडून सांगण्यात येत आहे, तर हा प्रकार मिटविण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (वार्ताहर)