शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दौंडच्या पाण्याने घेतला भावडांचा बळी

By admin | Updated: May 6, 2016 05:43 IST

आईवडील कामासाठी घराबाहेर पडल्यानंतर वडगाव येथील कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावंडांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला. या दोघांचेही वाहत आलेले मृतदेह

पुणे : आईवडील कामासाठी घराबाहेर पडल्यानंतर वडगाव येथील कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावंडांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला. या दोघांचेही वाहत आलेले मृतदेह बी. टी. कवडे रस्त्यावरील कालव्यात आढळून आल्यानंतर गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. बुधवारी खडकवासला धरणामधून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या लोंढ्यात हे दोघेही वाहून गेले. या दोघांचेही मृतदेह अग्निशामक दलाच्या जवानांनी बाहेर काढले. लक्ष्मी बाळू धांडे (वय ८), कृष्णा बाळू धांडे (वय ७, रा. दोघेही वडगाव बुद्रुक, सिंहगड रस्ता) असे मृत्यूमुखी पडलेल्या भावंडांची नावे आहेत. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी बी. टी. कवडे रस्त्यावरील शिवरकर बंगल्याजवळील कालव्यात एका मुलाचा मृतदेह वाहात आल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली होती. दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत हा मृतदेह बाहेर काढला. दरम्यान, तेथेच आणखी एका मुलीचा मृतदेह वाहात आला. हा मृतदेहही बाहेर काढण्यात आला. दुपारपासूनच या मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरु होते. दरम्यान शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना या मुलांबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दोन मुलांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याचे समजले. लक्ष्मी आणि कृष्णा बुधवारी घरासमोर खेळत होते. खेळता खेळता हे दोघेही कालव्यामध्ये गेले. काही वेळाने त्यांचा काहीच थांगपत्ता लागला नाही. अंधार पडल्यानंतर कुटुंबियांनी या दोघांची शोधाशोध सुरु केली. परंतु, त्यांचा काहीच ठावठिकाणा न लागल्यामुळे सिंहगड रोड पोलीस ठाण्यात आई आणि आजीने धाव घेतली. कायद्यानुसार १४ वर्षांखालील मुले हरवल्यास अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येत असल्याने पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. आजी विमल शंकर पवार (वय ४५, रा. सांगवी) यांनी फिर्याद दिली होती. संपुर्ण रात्र मुलांच्या आठवणीमध्ये जागून काढलेल्या आई आणि आजीला गुरुवारी दोन्ही मुलांचे मृतदेह मिळाल्याचे समजताच धक्का बसला. या दोन मुलांच्या वडीलांचे काही वर्षांपुर्वी निधन झाले आहे.