शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

शुल्क कमी करण्यासाठी कुलगुरूंची आज बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:08 IST

पुणे: राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या शुल्कात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर ...

पुणे: राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या शुल्कात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर राज्यातील सर्व विद्यापीठांना ''ट्यूशन फी'' वगळून इतर शुल्क कमी करता येऊ शकते का? याबाबत येत्या सोमवारी (दि. २८) राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंबरोबर ऑनलाइन बैठक घेऊन चर्चा केली जाणार आहे, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या केवळ ऑनलाइन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे प्रयोगशाळा, कम्प्युटर लॅब, जिमखाना, ग्रंथालय आदी गोष्टींचा लाभ विद्यार्थी घेत नाहीत. त्यामुळे हे शुल्क कमी करावे, अशी मागणी केली जात होती. त्यावर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सुमारे २६ हजार रुपये शुल्क कमी करण्यात आले. राज्यातील सर्व विद्यापीठांना याबाबत आवाहन केले जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

सामंत म्हणाले की, राज्यात व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विनाअनुदानित महाविद्यालयांचे शुल्क निश्चित करण्याचे अधिकार रेग्युलेटिंग ॲथोरिटीला (एफआरए) आहे. तांत्रिक कारणामुळे एफआरए समिती स्थापन होऊ शकली नव्हती. एफआरए स्वायत्त असून व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शुल्क कमी करण्याबाबत या समितीकडून शासनाला प्रस्ताव प्राप्त झाल्यास त्यावर निर्णय घेतला जाईल. तसेच एफआरए स्वतः विद्यार्थी व पालकांना दिलासा देण्यासाठी निर्णय घेऊ शकते.

-------------

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सीईटी

एआयसीटीईने १ ते १५ सप्टेंबर दरम्यान नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करावे, अशा सूचना केल्या आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सीईटी घेतली जाणार आहे. तसेच अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सीईटी घ्यावी किंवा नाही,याबाबतचा निर्णय इयत्ता बारावीची गुणपत्रिका हातात पडल्यावर गुणपत्रिकेचा अभ्यास करून घेतला जाणार आहे. तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश बारावीच्या गुणपत्रिकेच्या आधारित केले जातील, असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले.