शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

पशुवैद्यकीय दवाखाने दयनीय, गटविकास अधिका-यांच्या निवासस्थानात चालते कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 01:07 IST

मावळ तालुक्यात शेतकरी वर्ग अधिक असून पशुधनही मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, या पशुधनाच्या उपचारासाठी असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या इमारतींची स्थिती विदारक आहे.

वडगाव मावळ : मावळ तालुक्यात शेतकरी वर्ग अधिक असून पशुधनही मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, या पशुधनाच्या उपचारासाठी असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या इमारतींची स्थिती विदारक आहे. वडगाव येथे दवाखान्यासाठी इमारतच नसल्याने थेट गटविकास अधिकारी यांच्या निवासस्थानात दवाखाना सुरु आहे. तर दुसरीकडे तळेगाव दाभाडे, कार्ला यासह तालुक्यातील इतर गावांमध्ये दवाखान्यांसाठी इमारत उपलब्ध आहे. मात्र, त्यांची स्थिती दयनीय असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले आहे.वडगाव मावळ : वडगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला जागा मिळत नसल्यामुळे गेल्या पाच ते सहा वर्षांपासून हा दवाखाना वडगाव येथील महसूल भवनाशेजारी असलेल्या पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या निवासस्थानात सुरू असल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी अजय सुपे यांनी दिली.सर्व सोयीसुविधा व प्रशस्त इमारत असलेल्या या दवाखान्यात नेहमीच वर्दळ असते. दवाखान्यातील कर्मचा-यांची दोन्ही पदे भरलेली असून, डॉक्टरही वेळेवर शेतक-यांना उपलब्ध होत असतात. इमारतीच्या परिसरात चांगल्या प्रकारची स्वच्छता आहे. वडगाव येथील हा दवाखाना कातवी, जांभूळ, सांगावी, साते, ब्राह्मणवाडी, मोहितेवाडी, कान्हे, वडगाव या गावांसाठी असून, या परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकरीवर्ग असल्यामुळे जनावरांच्या उपचारासाठी दवाखान्यात येणा-यांची नेहमीच गर्दी असते. तसेच या भागातील शेतकरी हा प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळखला जातो. या शेतक-यांकडे मोठ्या प्रमाणत जनावरे असतात. शेतकरी आपल्या शेतातच प्रशस्त असा गोठा बांधत असल्यामुळे त्यांना छोट्या-मोठ्या आजारासाठी जनावरांना दवाखान्यात नेणे शक्य नसते. अशा वेळी शेतकºयांनी फोन केल्यास डॉक्टर येत असल्याची माहिती शेतकºयांनी दिली. तसेच या दवाखान्यात गाय, म्हैस, बैल, घोडे, कुत्रा, पाळीव मांजर यांच्यावर विशेष उपचार केले जातात.दवाखान्याच्या वतीने शेतक-यांना चारा वाढीसाठी मका, ज्वारी, कॅल्शियम पावडर शासकीय किमतीत दिली जाते. तसेच पशुधन विमा योजनादेखील वर्षभर राबवली जाते. यामध्ये शेतकºयांना कडबाकुटी मशिन व रबर मॅट वाटप केले जाते. तसेच दवाखान्यामार्फत वेगवेगळ्या गावांत शिबिरे घेतली जातात. यामध्ये वंध्यत्व उपचार व जनावरांची कशी काळजी घ्यायची, याचे प्रशिक्षण दिले जाते. अशा सर्व सोयीसुविधा असणाºया दवाखान्याला लवकरच शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.